20.4 C
New York

Ajit Pawar : धनुष्यबाण, कमळ अन् घड्याळ लक्षात ठेवा; अजितदादांची बहीणींना साद

Published:

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा (Ladaki Bahin Yojna) राज्यस्तरीय शुभारंभ आज पुण्यातील बालेवाडी येथे झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमात सहभागी महिलांशी संवाद साधलांना अजित पवारांनी येत्या पाच वर्षात आम्ही लाडक्या बहिणींना 90 हजार रुपये देणार आहोत, फक्त आम्हाला पुढील पाच वर्षांसाठी निवडून द्या, येणाऱ्या निवडणुकीत घड्याळ, धनुष्यबाण आणि कमळ लक्षात ठेवा, अशी साद त्यांनी लाडक्या बहिणींना घातली.

Ajit Pawar हे सर्वसामान्यांचे सरकार

अजित पवार म्हणाले की, महिलांसाठी काय करता येईल याचा विचार करत असताना आम्ही लाडकी बहिण योजना आणली. त्यावरून विरोधक टीका करतात. लाडक्या बहिणींकडे लक्ष दिलं, पण भावांकडे लक्ष दिलं नाही, असं ते सांगतात. अरे शहाण्यांनो, कोण म्हणतो भावांकडे लक्ष नाही. आम्ही वीज बिल माफ केले. युवक युवतींना प्रशिक्षणार्थींसाठी वेतन सुरू कले. हे सरकार सर्वसामान्यांचे सरकार आहे, असं अजित पवार म्हणाले.

आळंदीत पोलिसांचा उल्लेख करत अजितदादांनी भरला ‘दम’

Ajit Pawar योजना सुरूच राहणार

हे सर्वसामान्य जनतेचा विचार करणार सरकार आहे. या योजनेला काही लोकांनी विरोध केला. कोर्टात गेले. त्यातही ते टिकले नाही. विरोधक काय बोलतात याकडे लक्ष देऊ नका. त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. ही योजना सुरूच राहणार आहे. पण, आता विरोधकानी ही योजना तात्पुरती असल्याची चर्चा सुरू केली. आमचे पाच महिने बाकी आहेत. या पाच महिन्यात तुम्हाला साडेसात हजार रुपये मिळतील, असं अजित पवार म्हणाले.

Ajit Pawar पुन्हा महायुतीला संधी द्या

या योजनेत सातत्य टिकवायचं आहे. ते टिकवायचं की नाही, ते तुमच्या हातात आहे. हे सातत्य टिकववायचं असेल तर पुढच्या पंचवार्षिकला पुन्हा महायुतीला संधी द्या, पुन्हा आम्हाला पाठबळ द्या. आम्ही कामाचे माणसं आहोत. शब्दाला पक्के आहोत. आम्ही वेळ मारून नेणारे नाही. आज 1 कोटी 8 लाख लोकांचे अर्ज मंजूर झाले. 1 कोटी 3 लाख लोकांना पैसे मिळाले. आम्ही जे बोलतो, ते करतो. त्यामुळे विरोधकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. विरोधक टीका करततात. त्याकडे लक्ष देऊ नका, असं अजित पवार म्हणाले.

Ajit Pawar पैसे काढून घेणार नाही

विरोधकांनी लोकसभेतही संविधान बदलणार असं खोटंनाट सांगितलं. आता त्याला बळी पडायचे नाही. हे पैसे भाऊबीज म्हणून दिले. ते परत घेण्यासाठी दिले नाही. हा तुमचा हक्क आहे. त्यामुळं कोणी काय बोलत असेल तर त्याकडे लक्ष देऊ नका. त्यांना सरळ सांगा, ए त्या दिवशी तिन्ही भावांनी सांगितलं की, पैसे काढून घेणार नाही. ही ओवाळणी आहे. ती आम्हालाच राहिल, असं ठणकावून सांगा, असंही अजितदादा म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img