17.6 C
New York

Maharashtra Politics : CM पदाचा उमेदवार कोण? मविआ अन् महायुतीचा रिव्हर्स गिअर

Published:

राज्यात विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्या (Elections 2024) आहेत. परंतु सत्ताधारी आणि विरोधक या (Maharashtra Politics) दोघांनीही मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केलेला नाही. याचं महत्त्वाचं कारण 2019 नंतर राज्यात जी राजकीय उलथापालथ झाली आहे त्यात दडलेल आहे. निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर शिवसेना आणि भाजप यांच्यातील 25 वर्षे जुनी युती तुटली. भाजपने विश्वासघात केल्याचा आरोप उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केला होता.

त्यावेळी सुद्धा वाद मुख्यमंत्रीपदाचाच होता. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीच पुन्हा मुख्यमंत्री व्हावं असं भाजपच्या नेत्यांना वाटत होतं. मात्र उद्धव ठाकरे यासाठी अजिबात तयार नव्हते. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी आपल्याला भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिल्याचे सांगितले. या मुद्द्यावर युतीतील दोन्ही पक्षांत प्रचंड तणाव निर्माण झाला होता. नंतर मात्र उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी हातमिळवणी करत सरकार स्थापन केले. या महाविकास आघाडी (MVA) सरकारमध्ये उद्धव ठाकरे जवळपास अडीच वर्षे राज्याचे मुख्यमंत्री होते. नंतर मात्र शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी (Eknath Shinde) बंडखोरी करत भाजपशी हातमिळवणी केली. त्यामुळे महा विकास आघाडीचे सरकार कोसळले होते. तेव्हापासून एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. आता विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत तेव्हा आताच राज्याचं राजकीय समीकरण नेमकं काय आहे हे समजून घ्यावं लागेल. जागावाटपाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यावरून मविआ आणि महायुती दोघांतही धुसफूस सुरू आहे.

महायुती सरकारला बहीण नाही तर सत्ता लाडकी, काँग्रेसचा हल्लाबोल

महायुती मधील शिंदे गट आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीत खटपट वाढली आहे. यामुळे महायुतीची राजकीय गणितं डळमळीत होऊ लागली आहेत. विरोधी महाविकास आघाडीतही वेगळी परिस्थिती नाही. त्यामुळेच दोन्ही आघाड्यांनी अजूनही मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केलेला नाही. हा उमेदवार जाहीर होईल याची फारशी शक्यताही दिसत नाही. पण राजकारणात काहीही होऊ शकतं असं म्हणतात. त्यामुळे आगामी काळात काय राजकीय घडामोडी घडतात यावर बरेच काही अवलंबून राहणार आहे. भाजपच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले की एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की एकनाथ शिंदे सध्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. ज्यावेळी राजकीय नेत्यांची गोष्ट असते त्यावेळी भाजपसाठी देवेंद्र फडणवीस अतिशय महत्त्वाचे ठरतात. याच पद्धतीने राष्ट्रवादीसाठी अजित पवार आणि शिवसेनेसाठी एकनाथ शिंदे सर्वाधिक महत्वाचे आहेत. अशा परिस्थितीत मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल याचे उत्तर आज देता येणार नाही अशी माहिती या पदाधिकाऱ्याने दिली.

Maharashtra Politics महायुतीत काय चाललंय

महायुतीचे नेते सध्या आपसातील वाद मिटविण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे. पहिल्या टप्प्यात महायुती मधील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांची संयुक्त मेळावे आणि रॅली पूर्ण राज्यात निघणार आहे. यावरून स्पष्ट होत आहे की महायुतीत ज्या गोष्टी ठीक दिसत नाहीत त्या दुरुस्त करण्याचा प्रयत्न या माध्यमातून होतोय.

Maharashtra Politics महाविकास आघाडीतही खटपट

महाविकास आघाडीत मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा कोण असेल यावर अजून तरी एकमत झालेलं नाही. या मुद्द्यावर आघाडीत वाद निर्माण होण्याची शक्यता असल्याचे राजकीय जाणकार सांगत आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले होते की राज्यात उद्धव ठाकरे सरकार 2.0 बनणार आहे. पण यावर काँग्रेसची (Congress Party) भूमिका स्पष्ट नाही.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img