15.6 C
New York

Palghar : दिल्लीच्या मिनिट-टू-मिनिट कार्यक्रमासाठी पालघरच्या ‘या’ दाम्पत्याची निवड

Published:

पालघर : (Palghar) भारत सरकारच्या नीती आयोगाने आयोजित केलेल्या मिनिट-टू-मिनिट कार्यक्रमासाठी जव्हार तालुक्यातून ग्रुप ग्रामपंचायत कासटवाडीचे लोकनियुक्त सरपंच कल्पेश विनायक राऊत व त्यांच्या पत्नी कल्याणी कल्पेश राऊत यांची निवड करण्यात आली आहे. नवी दिल्ली येथे १२ ते १६ ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या कार्यक्रमात ‘स्वातंत्र्य दिन – २०२४ या कार्यक्रमात सहभागी होण्याचा मान या राऊत दाम्पत्याला मिळाला असून या स्वातंत्र्य दिनाच्या समारंभात विविध बैठकींचे व अभ्यास दौऱ्यांचाही समावेश केला गेला आहे.दरम्यान पालघर जिल्ह्यासाठी ही अभिमानाची बाब असल्याचे कौतुक होत आहे.

पालघर उपजिल्हाधिकाऱ्याला लाच घेताना अटक

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img