26.5 C
New York

Amol Kolhe : जॅकेट,योजना फक्त हवा; अमोल कोल्हेंचा अजितदादांना टोला

Published:

आगामी विधानसभा (Vidhansabha Election) निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केली. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टीकेच्या फैरी झडत आहेत. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर (Ajit Pawar) जोरदार टीका केली. घड्याळ जरी चोरलं तुम्ही वेळ मात्र, आमची आहे. जॅकेट घाला, योजना काढा, हवा फक्त पवारसाहेबांची आहे, अशी कविता सादर करत त्यांनी अजितदादांवर टीका केली.

अमोल कोल्हे यांनी बारामतीतील शिवस्वराज्य यात्रेत जोरदार भाषण केलं. यावेळी बोलताना महायुती सरकार आणि अजित पवारांवर घणाघाती टीका केली. ते म्हणाले, काहीजण म्हणतात, आम्ही विकासासाठी सत्तेत गेलो. हे त्यांच्या तोंडून आपण अनेकदा ऐकतो. पण, आम्हाला एक दरारा असलेला आवाज ऐकायची सवय झाली होती. आता वाघाच्या आवाजाचं म्याव झालं की काय कळेना असं म्हणत कोल्हेंनी अजित पवारांवर टोला लागवला. यावेळी त्यांनी कवितेच्या माध्यतातूनही जोरदार टीका केली.

भाजपचा विधानसभेच्या 288 जागांसाठी फॉर्म्युला निश्चित ?

Amol Kolhe लाडक्या खुर्चीसाठी लाडक्या बहिणीची आठवण

पुढं ते म्हणाले, बारामतीकरांनी लोकसभा निवडणुकीत दाखवून दिलं. आता वेळ आली आहे, त्यांची जागा दाखवून द्यायची. शरद पवार यांच्या नेतृत्वात राज्य नाही तर देशाचं सरकारही बदलायचं आहे. त्यामुळे लोकसभेसारख कामाला लाग, अशा सूचना त्यांनी केल्या.

Amol Kolhe लाडक्या खुर्चीसाठी लाडक्या बहिणीची आठवण

कोल्हे यांनी लाडकी बहीण योजनेवरूनही. नऊ वर्षे भाऊ दारावरून कधी जातो कधीच कळत नाही आणि अचानक भाऊ दारात येऊन रक्षाबंधन करतो. भावाने आणि बहिणीने काय करावं? इतकी वर्षे बहीणीची आठवण आली नाही. लोकसभा निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण नव्हती. निवडणुकीनंतर जर ही परिस्थिती येत असेल तर नक्कीच विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन लाडकी बहीण योजना या सरकारने आणली. लाडक्या खुर्चीसाठी लाडक्या बहिणीची आठवण या सरकारला आल्याची टीका कोल्हेंनी केली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img