20.4 C
New York

Bihar : श्रावण सोमवारी सिद्धेश्वरनाथ मंदिरात चेंगराचेंगरी, 7 जणांचा मृत्यू

Published:

बिहारमधील (Bihar) जहानाबाद येथील सिद्धेश्वरनाथ मंदिरात मोठी दुर्घटना घडली. (Shravan) श्रावण सोमवार असल्यामुळं भगवान शिवच्या जलाभिषेकाच्या वेळी मंदिरात चेंगराचेंगरी झाली. यामध्ये सात भाविकांचा मृत्यू झाला आहे. १२ पेक्षा अधिक भाविक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये पाच महिलांचा समावेश आहे. जखमींमधील काहींची प्रकृती गंभीर आहे. आज श्रावण सोमवार असल्याने अनेक भाविक सिद्धेश्वरनाथ मंदिरात भगवान शिवला जलाभिषेक करण्यासाठी गर्दी करतात. मंदिरात प्रवेशासाठी भक्तांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

Bihar नक्की काय झालं ?

जहानाबादच्या मखदुमपुर येथील वाणावर बाबा सिद्धेश्वरनाथ मंदिरात ही दुर्दैवी घटना घडली. या दुर्घटनेसंदर्भात माहिती मिळताच पोलिस आणि आपत्ती निवारण पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवले. तर जखमी भाविकांवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ओबीसी एल्गार मेळाव्यातून भुजबळांचे मनोज जरांगेंना आवाहन, म्हणाले…

माहितीनुसार, श्रावणी सोमवार असल्याने हे सर्व भाविक भोलेनाथाच्या जलाभिषेकासाठी मंदिरात जमले होते. मंदिरात दर्शनासाठी भाविकांची लांबच लांब रांग लागली होती. सकाळी अचानाक धक्का–बुक्की झाल्याने रांग मोडली आणि चेंगराचेंगरी झाली. त्यामुळे एकच खळबळ माजली, भक्तांची धावपळ सुरू झाली आणि भाविकांनी जीव गमावला. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

Bihar जलाभिषेकादरम्यान झाली धक्काबुक्की

अपघातात जखमी झालेले आनंद कुमार उर्फ ​​विशाल यांनी सांगितले की, ही घटना रात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली. त्यावेळी मंदिरात जल अर्पण करणाऱ्यांची मोठी गर्दी झाली होती. आधी जल अर्पण करण्यासाठी भाविकांची लगबग सुरू झाली. काही वेळातच या हाणामारीचे चेंगराचेंगरीत रूपांतर झाले. अशा परिस्थितीत जे बाहेर गेले ते वाचले, पण जे आत अडकले होते, त्यांच्यावर किती जण चढले आणि ते बचावले, हे सांगू शकत नाही. पण त्यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img