15.6 C
New York

Devendra Fadnavis : अजित पवारांना सोबत घेऊन फायदा झाला नाही, संघाचा सूर; फडणवीस म्हणाले

Published:

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात झालेला पराभव भाजप (BJP) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) चांगलाच जिव्हारी लागला. अजित पवारांना (Ajit Pawar) सोबत घेतल्यानेच भाजपला फटका बसल्याचं संघाकडून बोललं जातयं. दरम्यान, आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरएसएस समन्वय बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) अजित पवारांची बाजू मांडल्याची माहिती आहे. देवेंद्र फडणवीस यांची शुक्रवारी (दि. 10 ऑगस्ट) संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत समन्वय बैठक झाली. या बैठकीत लोकसभा निवडणुकीतील पराभवावसह आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने चर्चा करण्यात आल्याचा दावा एका वृत्तवाहिनीने केला.

फडणवीस म्हणाले की, 2019 नंतर महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले, त्यावेळी भाजप हा सर्वात मोठा पक्ष होता. एकट्या भाजपची मतांची टक्केवारी पाहता भाजप स्वबळावर सत्तेवर येईल अशी स्थिती नव्हती. त्यामुळं प्रथम एकनाथ शिंदे यांना सोबत घेण्यात आले. तरी दोघांच्या मतांची टक्केवारी लोकसभा आणि नंतर विधानसभा निवडणुकीत आधीसारखंच यश मिळवून देईल अशी नसल्यानं अजित पवारांना सोबत घेण्यात आलं. लोकसभा निवडणुकीत भाजपचे 89% मत एकनाथ शिंदेंना टान्सफर झाले, तर शिंदेंचे वाटही 88% पर्यंत भाजपला ट्रान्सफर झाले, असं फडणवीसाांना सांगितल्याचा दावा एबीपी वृत्त वाहिनीने केला.

माझं मोहोळ उठलं ना…; राज ठाकरेंचा पवार अन् उद्धव ठाकरेंना दम

फडणवीस म्हणाले की, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सोबत घेतल्यानंतर सरकार म्हणून बरीच कामे करता आली. 2019 ते 22 या काळात महाविकास आघाडी सरकारच्या काळात खंडित झालेली काम पुन्हा सुरू करता आली. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्र भाजपमधील सर्व प्रमुख नेत्यांनी बसून परिस्थितीचा आढावा गेतला. मात्र, त्यातही विधानसभेला अजितदादांना सोबत घेऊनच महायुती म्हणून पुढं जावं असं ठरल्याचं फडणवीस म्हणाले.

शरद पवारांचा पक्ष फोडून, पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह घेऊनही अजित पवारांच्या पदरी निराशाच पडली. अजित पवारांना सोबत घेतल्यानेच लोकसभेमध्ये भाजपला फटका बसल्याची भूमिका संघाशी जवळीक सांगणाऱ्या साप्ताहिकांनी घेतली होती. त्यामुळं भापज आणि अजित पवार एकत्र लढणार नाहीत अशी शक्यता वर्तवली जात होती. दरम्यान, आता फडणवीसांनी विधानसभेला अजितदादांना सोबत घेऊनच निवडणूक लढणार असल्याचं स्पष्ट केलं.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img