26.5 C
New York

Vinesh Phogat : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेशला रौप्य पदक मिळणार?

Published:

विनेश फोगाट (Vinesh Phogat) पॅरिस ऑलिम्पिकमधून (Paris Olympic 2024) अपात्र ठरली आणि तिच्यासह कोट्यवधी भारतीयांच्या सुवर्ण स्वप्नांचा चुरडा झाला. निर्धारीत मर्यादेत वजन न बसल्यामुळे विनेशला फायनल सामन्यापूर्वीच अपात्र घोषित केलं गेलं. याच प्रकरणी दाद मागण्यासाठी विनेश फोगाटनं कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्टमध्ये ( Court of Arbitration for Sport) अर्ज केला होता. हा अर्ज स्वीकारण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, या अर्जावर आजच सुनावणी पार पडणार असल्याची माहिती मिळत आहे. विनेश फोगाटच्या वतीनं ज्येष्ठ वकील हरिश साळवे (Harish Salve) कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्टमध्ये बाजू मांडणार आहे.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताची धडाकेबाज महिला कुस्तीपटू विनेश फोगटच्या अर्जावर आज म्हणजेच, शुक्रवारी सुनावणी होणार आहे. त्यानं आपल्या अपात्रतेविरुद्ध CAS (कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट) मध्ये अर्ज दाखल केला होता, जो सुनावणीसाठी स्वीकारण्यात आला. यामध्ये त्यांनी संयुक्त रौप्य पदक देण्याची मागणी केली. क्रीडा न्यायालयानं विनेशला सुनावणीसाठी स्वत:चा वकील नेमण्याची संधी दिली आहे. ही सुनावणी भारतीय वेळेनुसार, दुपारी दीड वाजता पार पडणार आहे.

नीरज चोप्राची पुन्हा कमाल! भारताला भालाफेकमध्ये रौप्य पदक

यापूर्वी सीएएसमध्ये गुरुवारीच सुनावणी होणार होती. कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्टने विनेशची बाजू मांडण्यासाठी 4 वकील दिले होते. जोएल मोनलुइस, एस्टेल इव्हानोव्हा, हॅबिन एस्टेल किम आणि चार्ल्स एम्सन अशी त्यांची नावं आहेत. पॅरिस 2024 ऑलिम्पिकसाठी हे सर्व CAS चे निःशुल्क वकील आहेत. पण भारतीय संघानंही सुनावणीसाठी भारतीय वकील नेमण्यासाठी वेळ मागितला. त्यावर न्यायालयानं त्यांना वेळ देत सुनावणी दुसऱ्या दिवशी म्हणजेच, शुक्रवारपर्यंत तहकूब केली.

Vinesh Phogat हरीश साळवे IOA ची बाजू मांडणार

मिळालेल्या माहितीनुसार, विनेश फोगट अपात्रता प्रकरणात भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या वतीनं भारताचे माजी सॉलिसिटर जनरल आणि किंग्स काउंसिल वकील हरीश साळवे आज CAS समोर कुस्तीपटू विनेश फोगाटची बाजू मांडणार आहेत. साळवे यांना आज पॅरिस वेळेनुसार सकाळी 10 वाजता सुनावणीला हजर राहावं लागणार आहे. साळवे यांना या प्रकरणाची माहिती देण्यात आली असून त्यांचं नाव आयओएचे वकील म्हणून सीएएससमोर सादर करण्यात आलं आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img