7.2 C
New York

Sharad Pawar : शरद पवार गटाकडून ही ‘शिवस्वराज्य’ यात्रेचे आयोजन

Published:

राज्यातील विधानसभा निवडणूक आवघ्या काही दिवसांवर आली आहे. राज्यातील सर्वच पक्ष या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कामाला लागले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने जनसन्मान यात्रेचे आयोजन केले आहे. (Sharad Pawar) या यात्रेच्या माध्यमातून अजित पवार संपूर्ण महाराष्ट्रभर फिरणार आहेत. राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांचा या यात्रेत सहभाग असेल त्यांच्या या यात्रेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. असे असतानाच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेनंतर आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडूनही एक यात्रा काढली जाणार आहे. आज (9 ऑगस्ट) या यात्रेचा शुभारंभ होईल.

Sharad Pawar शिवनेरीच्या पहिल्या पायरीला अभिवादन करून यात्रेला सुरुवात

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या जनसन्मान यात्रे कालच सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीची ‘शिवस्वराज्य यात्रा’ आज शरद पवार यांच्यासुरू होत आहे. शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरी गडाच्या पहिल्या पायरीला अभिवादन करून या यात्रेचा शुभारंभ होणार आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत पहिल्या दिवसाची यात्रा पार पडेल.

आज ‘या’ नेत्याकडून होणार नव्या आघाडीची घोषणा?

Sharad Pawar पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात जाणार यात्रा

या यात्रेच्या माध्यमातून जुन्नरमधील लेण्याद्री येथे सकाळी 11 वाजता पहिली सभा घेण्यात येईल. त्यानंतर आंबेगाव, खेड-आळंदी आणि शेवटची सभा भोसरी विधानसभेत संपन्न होईल. पुढील दहा दिवस ही यात्रा पश्चिम महाराष्ट्रातून मराठवाड्यातील वेगवेगळ्या मतदारसंघांत पोहोचणार आहे. या यात्रेच्या शुभारंभासाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते सकाळी 9 वाजता शिवनेरी गडाच्या पायथ्याशी एकत्र येणार आहेत.

Sharad Pawar अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून जनसन्मान यात्रा

दरम्यान, अजित पवार जनसन्माम यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेशी संपर्क साधणार आहेत. या यात्रेचे काटेकोर नियोजन करण्यात आले आहे. यात्रेतील बस, चारचाकी वाहने यांना गुलाबी रंग देण्यात आला आहे. गुलाबी रंगाचे जॅकेट या यात्रेचे काम पाहणाऱ्या मॅनेजमेंट टीमनेही परिधान केलेले आहेत. अजित पवार राज्यातील महिला मतदारांना या यात्रेच्या मदतीने आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत.त्यामुळे यात रणनीतीत ते किती यशस्वी ठरणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img