17.6 C
New York

Buddhadeb Bhattacharya : पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांचे निधन

Published:

पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांचे आज सकाळी साडेआठच्या सुमारास निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखलही करण्यात आलं होतं. आता त्यांचं निधन झालं आहे. कोलकाता येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 80 वर्षांचे होते. ते 80 वर्षांचे होते. बंगालच्या माजी मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी सकाळी 8.20 वाजता अखेरचा श्वास घेतला. ते बरेच दिवस आजारी होते. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता

भट्टाचार्य यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि एक मुलगी आहे. माकपचे राज्य सचिव मोहम्मद सलीम यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. 2015 मध्ये भट्टाचार्य यांनी CPI(M) च्या पॉलिट ब्युरो तसेच त्यांच्या पक्षाच्या केंद्रीय समितीचा राजीनामा दिला होता. जुलैमध्ये अचानक श्वास घेण्यास त्रास होत असल्यानं त्यांच्या शारीरिक त्रासात वाढ झाली. त्यानंतर त्यांना कोलकाता येथील वुडलँड हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. बुद्धदेव भट्टाचार्य यांच्या प्रकृतीची माहिती मिळताच वुडलँड्समधून माजी मुख्यमंत्र्यांच्या पाम अव्हेन्यू येथील घराकडे रुग्णवाहिका पाठवण्यात आली. वैद्यकीय अधिकारी आणि पॅरामेडिक्स रुग्णवाहिकेतून पाम अव्हेन्यू येथे आले आणि त्याला रुग्णालयात आणण्यात आलं.

अजित पवार गुलाबी जॅकेट घालून आजपासून महाराष्ट्र पिंजून काढणार!

Buddhadeb Bhattacharya बुद्धदेव भट्टाचार्य कोण होते?

पश्चिम बंगालचे भट्टाचार्य 2000 ते 2011 पर्यंत मुख्यमंत्री होते. ते भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) च्या पॉलिटब्युरोचे सदस्यही होते. बुद्धदेव भट्टाचार्य यांचा जन्म 1 मार्च 1944 रोजी उत्तर कोलकाता येथे झाला. नंतर त्यांनी माकपमध्ये प्रवेश केला. त्यांना डेमोक्रॅटिक युथ फेडरेशनशी जोडले गेले. त्यांना सीपीआयच्या युवा शाखेचं राज्य सचिव बनवण्यात आलं, जी नंतर डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियामध्ये विलीन झाली होती.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img