15.6 C
New York

Jayant Patil : महायुती सरकार घाबरले, जयंत पाटलांचा आरोप

Published:

लोकसभेनंतर आता सर्वच राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकीची (Vidhansabha Election) तयारी सुरू केली. त्यापूर्वीच राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सातत्याने टीकेच्या फैरी झडत आहेत. अशातच आता शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी महायुती (Mahayuti) सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. सद्यस्थितीत शिंदे सरकार कमालीचे घाबरले असून ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका नोव्हेंबरमध्ये ढकलण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप पाटील यांनी केला. जयंत पाटील यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत घेतली. यावेळी त्यांनी शिवस्वराज्य यात्रा-2 ची घोषणा केली. यावेळी त्यांनी या यात्रेचा टीझर आणि लोगोचे प्रकाशनही केले. यावेळी पाटील यांच्यासह खासदार अमोल कोल्हे, अनिल देशमुख, राजेश टोपे, सुनील भुसारे आदी उपस्थित होते.

Jayant Patil म्हणून सरकार तिजोरी मोकळी करतंय…

यावेळी बोलतांना पाटील म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत केंद्र आणि राज्य सरकारवर जनतेने तीव्र नाराजी व्यक्त केली. महाविकास आघाडीने राज्यातील 48 पैकी 31 जागा जिंकल्या. तर महायुतीचा जनतेनं पराभव केला. महाराष्ट्रातून यांना आपण हद्दपार करू शकतो हे जनतेनं दाखवून दिलं. आताही बहाद्दर जनतेने महायुती सरकारला सत्तेवरून खेचण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सरकार घाबरून सरकारी तिजोरी मोकळी करत विविध योजना सुरू करत आहे. अशा घोषणाही जनतेला पटत नसल्याचं पाटील म्हणाले.

मुंबईतील प्रभादेवीत शिंदे गट-ठाकरे गटात राडा

Jayant Patil शिंदे सरकारचा निवडणुका पुढं ढकल्याचा प्रयत्न…

यावेळी बोलतांना पाटील यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले, सद्यस्थितीत शिंदे सरकार कमालीचे घाबरले आहे. त्यामुळेच त्यांनी ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका एक महिना पुढं म्हणजे नोव्हेंबरमध्ये ढकलण्याची बुद्धी सूचत आहे, असा आरोपही जयंत पाटील यांनी केला. सरकार 15 नोव्हेंबरनंतर विधानसभा निवडणुका घेण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. योजनांचे पैसे लोकांना देण्यासाठी ते असा प्रयत्न करत आहे, असा दावाही पाटील यांनी केला.

Jayant Patil महायुतीचे कारनामे जनतेसमोर मांडणार- पाटील

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 9 ऑगस्टला शिवनेरी किल्ल्यावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांचे आशिर्वाद घेईल. त्यानंतर महाराष्ट्रात शिवस्वराज्य यात्रा-2 सुरू होणार आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था कशी बिघडली आहे? हे सरकार आल्यानंतर बेरोजगारी कशी वाढली, महाराष्ट्र कसा मागं गेला. ते आम्ही या यात्रेच्या लोकांपर्यंत पोहोचवू. यात्रेच्या माध्यमातून महायुती सरकारच्या काळे कारनामे घेऊन आम्ही जनतेच्या दरबारात जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img