20.4 C
New York

Girna River Rescue : गिरणा नदीत अडकलेल्या 12 मासेमारांची अखेर सुटका

Published:

राज्यभरात पावसाचे थैमान सुरुच आहे. गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पावसामुळे नाशिक जिल्ह्यातही जनजीवन विस्कळीत झालं आहे. धरणांच्या पाण्याची पातळी देखील वाढली आहे. रविवारी मासेमारी करण्यासाठी गेलेले 15 तरुण गिरणा नदी (Girna River) पात्रात पाणी पातळी वाढल्याने अडकून पडले होते. रविवारपासून त्यांच्या बचावासाठी रेस्क्यू ऑपरेशन (Girna River Rescue) सुरु होते. अखेर तब्बल 15 तासांनंतर तरुणांची लष्कराच्या हेलिकॉप्टरच्या (Helicopter) माध्यमातून सुटका करण्यात आली.

नाशिकच्या मालेगावातील सवंदगाव शिवारातील गिरणा नदीपात्रात अडकलेल्या १५ मासेमारांना रेस्क्यू करण्यात प्रशासनाला यश आले आहे. लष्कराच्या हेलिकॉप्टरद्वारे रेस्क्यू ऑपरेशन करत तीन फेऱ्यांमध्ये नदीपात्रात अडकलेल्या 15 मासेमारांना यशस्वीरीत्या बाहेर काढण्यात आले. नाशिकच्या मालेगावातील सवंदगाव शिवारातील गिरणा नदीपात्रात अडकलेल्या १५ मासेमारांना रेस्क्यू करण्यात प्रशासनाला यश आले आहे. लष्कराच्या हेलिकॉप्टरद्वारे रेस्क्यू ऑपरेशन करत तीन फेऱ्यांमध्ये नदीपात्रात अडकलेल्या 15 मासेमारांना यशस्वीरीत्या बाहेर काढण्यात आले.

लाडकी बहीण योजनेवर कोर्टाचा मोठा निर्णय

Girna River Rescue हेलिकॉप्टरद्वारे बाहेर काढले

तब्बल 15 तासांहून अधिक कालावधी उलटूनही 12 जणांना अद्याप नदीपात्रातून सुखरूप बाहेर काढता आलेले नव्हते. मनपा प्रशासन, अग्निशमन दल, एसडीआरएफ जवानांनी या 12 जणांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. नदीपात्रातील पाण्याच्या प्रवाह जास्त असल्याने तरुणांना बाहेर काढण्यास अडथळे निर्माण होत होता. नाशिकच्या जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे, आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद हे परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. अडकलेल्या तरुणांना जेवण पोहचवण्यात आले. दरम्यान, अशा आपत्कालीन परिस्थितीत आता हेलिकॉप्टरची मदत घेवून 12 जणांना बाहेर काढण्यात येणार असल्याची माहिती मालेगाव महापालिकेचे आयुक्त रवींद्र जाधव यांनी दिली होती. नुकतीच या 12 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.

मात्र रात्री अंधारामुळे बचावकार्य थांबविण्यात आले होते. सकाळी अग्निशमन दल आणि नागरिकांच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन राबविण्यास सुरुवात करण्यात आली. मात्र पुराच्या पाण्यात वाढ झाली असल्याने बचावकार्यात अडचणी पाण्यात अडकलेले सर्वजण एका उंच खडकावर असल्यामुळे सुखरूप होते. आज लष्कराच्या हेलिकॉप्टरच्या मदतीने 12 जणांना रेस्क्यू करण्यात आले. त्यामुळे पुराच्या पाण्यात अडकलेल्या तरुणांनी तब्बल 15 तासांनी सुटकेचा निश्वास सोडला.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img