17.2 C
New York

CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर झोपलेल्या प्रशासनाला आली जाग

Published:

लोणावळ्यात (Lonavala) दोन कुटुंब वाहून गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी (CM Eknath Shinde) कठोर कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर झोपलेल्या प्रशासनाला जाग आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला 24 तास उलटायच्या आतच प्रशासनाने पर्यटनस्थळावरील अतिक्रमाण हटवायला सुरुवात केली आहे. भुशी धरण परिसरात पर्यटनाला अडसर ठरणारी छोटे हॉटेल, फेरीवाले, चना-चाट विक्रेत्यांवर ही कारवाई करण्यात आलीय आहे. भविष्यात अन्सारी आणि सय्यद कुटुंबियांसारखी दुर्घटना घडू नये आणि त्याला ही अतिक्रमणे जबाबदार ठरू नयेत, म्हणून प्रशासनाने तातडीनं हा निर्णय घेतलाय. ही संयुक्त कारवाई लोणावळा नगरपरिषद आणि पुणे रेल मंडळ प्रशासनाने केली आहे. मात्र हा कारवाईत सातत्य राहणं गरजेचं आहे. लोणावळा नगरपरिषद आणि पुणे रेल मंडळ प्रशासनाकडून संयुक्त अतिक्रमण कारवाई सुरू आहे. चहा, नाष्टा, भजी विक्रेते, फेरीवाले, कणीस विक्रेते यांनी भुशी धरण परिसरात दुकाने थाटली होती. रेल्वे प्रशासनाने त्यामुळे कारवाईचा बडगा उचलला आहे.

CM Eknath Shinde रेल्वे पोलीस दल आणि लोणावळा पोलिसांचा मोठा बंदोबस्त

भुशी धरण लोणावळ्यातील पर्यटन स्थळ हे आज ओव्हरफ्लो झाले. पुणे आणि मुंबई यासह महाराष्ट्राच्या विविध भागांतून पर्यटक हे केवळ भुशी धरणात भिजण्याचा आनंद घेण्यासाठी येत असतात. मात्र या ठिकाणी अतिक्रमणामुळे मोठी गर्दी झाली आहे. दोन दिवसापूर्वी घडलेल्या दुर्घटनेनंतर प्रशासनाला जाग आली. कारवाईला सुरुवात याची गंभीर दखल घेऊन केली आहे. रेल्वे पोलीस दल आणि लोणावळा पोलिसांचा मोठा बंदोबस्त या कारवाईवेळी तैनात करण्यात आला होता. लोणावळ्यातील (Lonavala) धबधब्यात अन्सारी आणि सय्यद कुटुंबीय वाहून गेल्यानं पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याचअनुषंगाने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) कठोर कारवाईचे आदेश दिलेत. संध्याकाळी सहानंतर पर्यटकांना पर्यटनस्थळी फिरण्यास मज्जाव करण्यात आलंय.

पुण्यातील कोणकोणती पर्यटनस्थळं राहणार बंद?

CM Eknath Shinde लोणावळ्यात 24 तासात 136 मिमी पावसाची नोंद

पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र असणाऱ्या पुण्यातील लोणावळ्यात दिवसभर धो धो पाऊस झाला आहे. यंदाच्या मोसमातील सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. 136 मिलीमीटर पाऊस गेल्या चोवीस तासांत बरसला आहे. 106 मिलीमीटर पाऊस यंदा 12 जूनला कोसळला होता, त्यानंतर काल पावसाने तुफान बॅटिंग केली. आत्तापर्यंत या मोसमात 798 मिमी पावसाची नोंद झालीये.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img