17.2 C
New York

Devendra Fadanvis : पेपरफुटीनंतर परीक्षांबाबत फडणवीसांची मोठी घोषणा!

Published:

राज्यासह देशातील पेपरफुटीच्या प्रकरणांनंतर राज्यसरकारने मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार गट क (Group C exams) च्या जागा देखील पुढच्या सहा महिन्यांमध्ये एमपीएससीकडे वर्ग करण्यात येणार आहेत. त्यामुळे त्याची देखील परीक्षा एमपीएससी घेणार आहे. असं उत्तर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी विधानसभेमध्ये कॉंग्रेसच्या बाळासाहेब थोरातांनी राज्यातील पेपरफुटीवर उपस्थित केलेल्या प्रश्नावर दिले.

यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, राज्यातील पेपपफुटीची आणि परिक्षांमधील गैरप्रकार बघता आता कॅबिनेटने एक निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता गट क च्या जागा देखील पुढच्या सहा महिन्यांमध्ये एमपीएससीकडे वर्ग करण्यात येणार आहेत. त्यामुळे त्याची देखील परीक्षा एमपीएससी घेणार आहे. तशी लोकांची मागणी होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी एमपीएससीला मोठी तयारी करावी लागणार आहे. त्याला सात-आठ महिने लागतात. त्या संदर्भात एमपीएससीने मान्यता देणारे पत्र देखील दिलं आहे. अशी माहिती उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये दिली.

पुण्यात नागरिकांना चक्क बंदुकीने मारहाण, व्हिडिओ व्हायरल

त्याचबरोबर यावेळी त्यांनी तलाठी भरतीतील घोटाळ्यावर देखईल स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, तलाठी भरतीमध्ये झालेल्या गैरप्रकारानंतर त्यावर कारवाई करून ही परीक्षा रद्द केली. नव्याने परीक्षा घेण्याचे निर्णय घेतला. ही परीक्षा टीसीएसच्या केंद्रांवर घेण्यात येते मात्र विद्यार्थी संख्या जास्त असल्याने बाहेरील केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. त्याच बाहेरील केंद्रावर हा गैरप्रकार झाला. त्यामुळे फेरपरीक्षा या केवळ टीसीएसच्या केंद्रावरच होतील. जेणे करून परिक्षेतील गैरप्रकारांना आळा बसेल.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img