22.8 C
New York

Sanjay Raut : मंत्री नाईकांच्या ‘त्या’ वक्तव्यावर राऊतांचा चिमटा

Published:

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना लॉटरी लागली पण कमावलेलं टिकवता आलं पाहिजे असा टोला राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी लगावला होता. त्यांच्या या वक्तव्यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या वक्तव्यावर एकनाथ शिंदेंना खोचक टोला लगावला आहे. संजय राऊत यांनीएकनाथ शिंदेंना लॉटरी नाहीतर मटका लागला असा चिमटा काढला.

गणेश नाईक आधी शिवसेनेतच होते. शिवसेनेच्या पहिल्या मंत्रिमंडळात ते मंत्री होते. एकनाथ शिंदे यांचा राजकारणात उदयही झाला नव्हता तेव्हापासून नाईक राजकारणात आहेत. ही खरी गोष्ट आहे. त्यामुळे मार्गदर्शन करण्याचा अधिकार गणेश नाईक यांना नक्की आहे. गणेश नाईक एकेकाळी आमचे सहकारी होते. ते अत्यंत संयमी आहेत. ते पक्ष सोडून गेले त्यानंतर आम्ही त्यांच्यावर अनेकदा टीका केली पण त्यांनी कधीही संयम सोडून आमच्यावर प्रतिटीका केली नाही. हे पथ्य त्यांनी पाळलं आणि ते अत्यंत महत्वाचं असतं.

काल कुणाला तरी लॉटरी लागली आणि ते मुख्यमंत्री झाले उपमुख्यमंत्री झाले. लॉटरी हा एक प्रतिष्ठित शब्द आहे. महाराष्ट्र सरकारही कधीकाळी लॉटरी चालवत होते. पण आज राज्यात बेकायदेशीर मटका सुरू आहे. फडणवीस जरी मुख्यमंत्री असले तरी आकडा लावला जातो. तेव्हा कदाचित गणेश नाईक हे सभ्य आणि संस्कारक्षम असल्याने त्यांनी लॉटरी हा शब्द वापरला पण त्यांच्या डोक्यात मटका असेल.

मटक्याचा आकडा सांभाळला पाहिजे पण मटक्याचे आकडे चंचल असतात. लोकं चार चार मटके चालवतात. एकेकाळी गुन्हेगारी क्षेत्रात मी पत्रकारिता केली म्हणून मला हे माहिती आहे. मटक्याचे आकडे चंचल असतात. हे आकडे सांभाळता येणार नाही. त्यांच्या मटक्याचा आकडा काढणारा दिल्लीत बसलाय. ते जाऊन तिथे आकडा लावायचा प्रयत्न करतात. पण सध्या आकडा लागत नाही. हे सांभाळणं कठीण असतं, लवकरच यांचा आकडा अस्तंगत होईल.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img