संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आरोप केला की मुंबई महापालिका निवडणुकीत निवडणूक आयोग केवळ EVM वापरणार असून VVPAT मशीन लावणार नाही, त्यामुळे मतदाराला आपलं मत कुणाला दिलं हे कळणार नाही. त्यांनी सुचवलं की, जर मतमोजणीत उशीर होत असेल तर थेट मतपत्रिकेवर निवडणुका घ्याव्यात. यासाठी EVM मध्य प्रदेशातून आणले जात आहेत, जिथे सर्वात मोठा घोटाळा झाला होता, असंही त्यांनी सांगितलं.
शिंदे (Shinde) यांच्या दिल्ली दौर्यावर भाष्य करताना राऊत म्हणाले की, भाजप (BJP) व शिंदेसेना नेत्यांना पक्षाचे हायकमांड दिल्लीत असल्यामुळे तिथेच थांबावं लागतं आणि आदेशांची वाट पाहावी लागते. उद्धव ठाकरे (Uddhav Thacckery ) दिल्ली दौऱ्यावर असताना शिंदे यांचा दौरा फक्त योगायोग नसावा, असंही त्यांनी सूचित केलं.
राज्यात काही मोठं घडणार या चर्चांवर राऊत म्हणाले की, सध्याच्या सरकारमध्ये मोठी माणसं नाहीत, फक्त धरुन बांधून ठेवलेले पदाधिकारी आहेत. महाराष्ट्राला महान नेते देण्याची परंपरा भाजपमुळे तुटली असून मोठं राजकीय खेळ महाराष्ट्रात नाही, तर दिल्लीत घडेल, असा दावा त्यांनी केला.