32.8 C
New York

Sanjay Raut : पाकिस्तान, पीओकेवर मौन आणि संसदेत अनुपस्थिती संजय राऊतांचा मोदींवर घणाघात

Published:

शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor)सारखा राष्ट्रीय सुरक्षेचा गंभीर विषय संसदेत चर्चेत असतानाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) संसदेत अनुपस्थित होते, यावरून त्यांनी नाराजी व्यक्त केली.

राऊत म्हणाले की, भाजपला ना पाकिस्तानशी लढायचं आहे, ना पीओके पुन्हा भारतात आणायचा आहे. मग हे सरकार नक्की कशासाठी बसलंय, असा थेट सवाल त्यांनी केला.

त्यांनी लोकसभेतील कालच्या चर्चेचा संदर्भ देत सांगितलं की, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath singh) यांनी स्पष्ट केलं की, पीओकेवर कब्जा मिळवण्याचा भारताचा अजिबात उद्देश नाही. हे ऐकून देश हादरला पाहिजे. कारण भाजपकडून आतापर्यंत सतत पीओके भारतात आणण्याची भाषा केली जात होती.

योगी आदित्यनाथ आणि अमित शाह यांनी निवडणुकीत वारंवार पीओकेबाबत बलिदान देण्याच्या घोषणा केल्या होत्या. पण आता संरक्षणमंत्री काही वेगळंच बोलत आहेत, आणि पंतप्रधान त्यांच्या भाषणाचं सोशल मीडियावर कौतुक करत आहेत, ही गंभीर बाब असल्याचं राऊत म्हणाले.

त्यांनी पंतप्रधानांवर टीका करत म्हटलं की, विरोधकांनी संसदेत जे मुद्दे मांडले, त्यावर पंतप्रधानांनी स्वतः भाष्य करायला हवं होतं. पण ते त्याऐवजी सोशल मीडियावर भाषणांचं कौतुक करत होते. लोकशाही आणि संविधानाला कमी लेखण्याचा हा प्रकार असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img