ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांनी एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याबाबत मोठं विधान केले आहे. राऊतांच्या या विधानामुळे राज्यात पुन्हा एखदा मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांनी जोर धरला आहे. आमचा गट भाजपात विलिन करू पण, मला सीएम करा असे शिंदेंनी दिल्ली दौऱ्यात शहांना सांगितल्याचे राऊतांनी म्हटले आहे. एकनाथ शिंदे हे काल दिल्लीवारीवर असताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची तक्रार केल्याचा टोलादेखील राऊत यांनी लगावला. फडणवीस आमचीअडचण करत असून, आम्हाला ते काम करू देत नसल्याचेही राऊतांनी यावेळी सांगितले.
Sanjay Raut राज्यात मराठी एकजूट उपाय काय?
मराठी माणसाची एकजूट तुटली नाही तर राजकीय दृष्ट्या आपल्याला फार मोठे नुकसान होईल, असे शिंदेंनी सांगितल्यावर अमित शहा यांनी त्यांना त्यावर तोडगा काय असे विचारले. त्यावर शिंदेंनी मला मुख्यमंत्री करणं हा त्याच्यावरचा इलाज असल्याचे शिंदे म्हणाल्याचा दावा संजय राऊतांनी केला आहे. पण, त्यावर शाहंनी मुख्यमंत्री तर भाजपचाच असेल असे सांगतिले. त्यावर एकनाथ शिंदे यांनी आपण आपल्या गटासह भाजपामध्ये विलीन होण्यास तयार असून, पण मला मुख्यमंत्री करा असे शिंदेंनी शाहंना सांगितल्याचा दावा राऊतांनी केला आहे. ही भूमिका शिंदेंनी यापूर्वीदेखील वारंवार सांगितली आहे आणि काल पुन्हा एकादा शिंदेंनी याचा पुनुरूच्चार केल्याचे राऊत म्हणाले.
Sanjay Raut शाहांच्या चरणावर शिंदेंनी डोकं ठेवलं
काल गुरूपौर्णिमेनिमित्त त्यांनी अमित शाह यांचे पाद्यपूजन केले. त्यांच्या पायावर डोके ठेवल्याचा टोला त्यांनी लगावला. एखाद दुसरा नेता वगळता, शिंदेंना कुणी संरक्षण देत नसेल असे सांगत सत्तेचं संरक्षण तात्पुरता असतं, कारवाईला सामोरं जाव लागतं असे सूचक विधानही यावेळी बोलताना राऊतांनी केले. मात्र, हे विधान नेमकं कशासंबधित होतं याबद्दल राऊतांनी स्पष्ट केले नाही.