24.7 C
New York

Sanjay Raut : पंतप्रधान नरेंद्र मोदी निवृत्तीबाबत, संजय राऊतांचा खोचक टोला

Published:

७५ वर्षे वय झाल्यावर सत्तेच्या पदावरून निवृत्ती पत्करावी, असा नियम पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ( आरएसएस ) केला आहे. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या स्वार्थासाठी अनेक नेत्यांवर निवृत्ती लादली. आता पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या मनात निवृत्तीचे विचार येत आहेत, तर हे देशासाठी शुभ संकेत आहेत, अशी टोलेबाजी शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

‘जेव्हा पंच्याहत्तरीची शाल अंगावर पडते, त्याचा अर्थ आता थांबावे असा असतो. पंच्याहत्तरीनंतर माणसाने बाजूला होत इतरांना संधी दिली पाहिजे, असा संघकार्याचा वस्तुपाठ मोरोपंत पिंगळे यांनी घालून दिला होता,’ याची आठवण सरसंघचालक मोहन भागवत यांनी बुधवारी काढली. दुसरीकडे, ‘राजकारणातून निवृत्त झाल्यावर मी आयुष्यभर नैसर्गिक शेती करण्याचे ठरवले आहे. निवृत्तीनंतर संपूर्ण आयुष्य वेद, उपनिषद वाचण्यात वेळ घालवणार आहे,’ असे वक्तव्य अहमदाबाद येथे बोलताना गृहमंत्री अमित शहा यांनी केले होते. या दोन्ही वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

संजय राऊत म्हणाले, “७५ वर्षे वय झाल्यावर सत्तेच्या पदावरून निवृत्ती पत्करावी, असा नियम पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ( आरएसएस ) केला आहे. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या स्वार्थासाठी आणि आपले मार्ग मोकळे करण्यासाठी लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांच्यासारख्या नेत्यांवर निवृत्ती लादली.”

“सप्टेंबर महिन्यात पंतप्रधान मोदी हे ७५ वर्षांचे होत आहेत. त्यांची दाढी पिकलेली आहे, डोक्यावरील केस उडालेले आहेत. जगभ्रमण करून झाले आहे. सगळी सत्तेची सुख भोगलेली आहेत. आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पंतप्रधान मोदी यांना निवृत्त होण्यासाठी सूचना देत आहे. आणि देश सुरक्षित हातात द्यावा लागेल,” असे खासदार राऊत यांनी म्हटले.
अमित शहा यांच्या वक्तव्यावर विचारले असता संजय राऊत म्हणाले, “हा त्यांचा प्रश्न आहे, पुढे काय करायचे. निवृत्तीनंतर जिवनात चांगल्या गोष्टी करता येतात. अनेकजण सामाजिक कामे करतात. किंबहूना दोन्ही ( मोदी, शहा ) नेत्यांच्या मनात निवृत्तीचे विचार येत आहेत, देशासाठी शुभ संकेत आहेत.”

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img