इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या दोन वर्षांपासून रक्तरंजित संघर्ष सुरुये. (Israel Gaza War) गाझा येथील परिस्थिती आता तर आणखी बिकट झालीये. गाझा पट्टीतील पुन्हा एकदा इस्रायलने गाझामध्ये हवाई हल्ले केले आहेत. 33 पॅलेस्टिनी नागरिकांचा इस्रायलने केलेल्या या हल्ल्यांमुळे मृत्यू झाला आहे. काही लहान मुलांचाही(Israel) मृत्यू झालेल्यांमध्ये यात समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. अनेक मोठ्या इमारतींचं त्याचबरोबर नुकसान झालं आहे.
गाझामधील 100 हून अधिक ठिकाणांवर काल एका दिवसात हल्ला केला आहे. यात मोठं नुकसान झालं आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू युद्धबंदीच्या चर्चेसाठी अमेरिकेला जाणार आहेत. त्याचवेळी हा हल्ला करण्यात आला आहे. या युद्धबंदी साठी डोनाल्ट ट्रम्प हे प्रयत्न करत आहेत. 21 महिन्यांपासून सुरू असलेले युद्ध पूर्णपणे संपवण्यासाठी नेतान्याहू आणि ट्रम्प यांच्यात चर्चा होणार आहे असं इस्रायली सैन्याने या हल्ल्याबाबत बोलताना म्हटलं आहे.
गाझा शहरातील शिफा रुग्णालयाचे संचालक मोहम्मद अबू सेल्मिया यांनी सांगितले की, इस्रायलच्या हवाई हल्ल्यात गाझात मोठे नुकसान झालं आहे. गाझा शहरातील दोन घरांवर निशाणा साधण्यात आला. यात 20 लोक ठार झाले आणि 25 जण जखमी झाले आहेत. तसंच, नासिर रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की 13 नागरिकांचा मृत्यू 13 नागरिकांचा मृत्यू मुवासी भागात झालेल्या हल्ल्यात झाला आहे.
इस्रायली सैन्याने गेल्या 24 तासांत गाझा पट्टीतील 130 ठिकाणी हल्ला केल्याचेंसमोर आलं आहे. या हल्ल्यांमध्ये हमासच्या कमांड अँड कंट्रोल स्ट्रक्चर्स, स्टोरेज सेंटर्स आणि शस्त्रास्त्रांना लक्ष्य करण्यात आलं. त्याचबरोबर उत्तर गाझामधील अनेक दहशतवाद्यांचा मृत्यू झाला आहे. तसंच, 47 पॅलेस्टिनी नागरिकांचा शनिवारी इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.