24.5 C
New York

Sanjay Raut : उद्धव ठाकरेंवर टीका करणाऱ्या शिंदेंचा राऊतांनी घेतला समाचार, म्हणाले

Published:

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्यानंतर देशात वातावरण निर्माण झालंय की हिंदी सक्तीविरोधात महाराष्ट्रात ठिणगी पडली आहे. अनेक राज्यातील नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधला. महाराष्ट्राने घेतलेल्या भूमिकेचं अनेकांनी स्वागत केलं. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्यानंतर आम्हालासुद्धा केंद्रातील सत्तेविरोधात लढण्याचं बळ मिळालं आहे. आम्ही लढत राहू, असा एल्गार शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केला आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

संजय राऊत म्हणाले, वरळीत संपूर्ण महाराष्ट्र एकवटल्याचं चित्र होते. त्याच ताकदीवर आम्ही हिंदू सक्तीविरोधातील लढाई जिंकली आहे. या सक्तीविरोधात दक्षिणेतील अनेक राज्यांत लढाई सुरू आहे. आमच्या विजयी मेळाव्यानंतर तामिळनाडूसारख्या राज्यांनी स्पष्ट केले की, ‘आता आम्ही केंद्राशी लढू शकतो आणि आमच्यावरील सक्ती उलटवून टाकू शकतो.’

Sanjay Raut महायुतीच्या नेत्यांच्या डोक्यात सडकी बटाटी भरली

राज ठाकरे यांनी भाषणातून एक राजकीय भूमिका महाराष्ट्रासंदर्भात मांडली आहे, हे उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणाऱ्यांना कळलं पाहिजे. ‘विधानसभेत सत्ता तुमची आहे, पण रस्त्यावर आमची आहे,’ हे राज ठाकरे यांचं विधान अराजकीय नाहीतर राजकीय होते. पण, महायुतीच्या नेत्यांच्या डोक्यात सडकी बटाटी भरली आहेत. महायुतीचे नेते विजयी मेळाव्यानंतर गोंधळलेले आहेत. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याने त्यांचं डोके चालेनासे झाले आहे. ठाकरेंनी काय बोलावे, हे सांगावे लागत नाही. लेखणी आणि वाणीच्या माध्यमातून आपलं साम्राज्य स्थापन केले, असे प्रत्युत्तर संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करणाऱ्यांना दिले आहे.

Sanjay Raut फडणवीस हे गोंधळलेले आहेत

दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गोंधळलेले आहेत. दोन्ही ठाकरे बंधूंमुळे तुमच्या मनात भीती निर्माण झाली आहे. आता जाहीरपणे रडणं तुमचे सुरू झाले आहे. महाराष्ट्रात जागोजागी रडण्याचे कार्यक्रम मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घ्यावे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

Sanjay Raut एकनाथ शिंदे यांची दाढी खोटी

एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रात ‘जय गुजरात’ म्हणतात, त्यामुळे त्यांच्या कोणत्याही म्हणण्याला अर्थ नाही. ते महाराष्ट्राचे राहिलेले नाहीत. एकनाथ शिंदे यांची दाढी खोटी आहे. ही दाढी कधी अमित शहा कापतील हे कळणार सुद्धा नाही. शिंदेंची दाढी ही गद्दारांची, अफजलखान आणि शाहिस्तेखानची आहे, असा तिखट स्वरूपात संजय राऊत यांनी टीका केली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img