21.2 C
New York

Ashadhi Ekadashi 2025 : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक विठूरायाची शासकीय महापूजा, माऊली चरणी कोणतं साकडं घातलं?

Published:

आज (6 जुलै) पंढरपूर नगरीमध्ये धार्मिक आणि भक्तिमय वातावरणात आषाढी एकादशीनिमित्त (Ashadhi Ekadashi 2025) उत्सव साजरा होत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (CM Devendra Fadnavis)यानिमित्त सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात शासकीय महापूजा (Pandharpur) केली. त्यांच्या सोबत पत्नी अमृता फडणवीस आणि मुलगी दिविजा देखील (Vitthal Mahapuja) उपस्थित होत्या.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल मूर्तीला दुधाचा अभिषेक करण्यात आला. खास पोशाख परिधान करून आरती करण्यात आली. पूजेनंतर त्यांनी रुक्मिणी मातेच्या मूर्तीला देखील अभिषेक अन् पूजा केली. यावेळी नाशिकच्या जातेगाव येथील मानाचे वारकरी कैलास आणि कल्पना उगले दाम्पत्य देखील उपस्थित होतं. मुख्यमंत्र्यांनी त्यांचा सन्मान शाल आणि विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या मूर्तीच्या भेटवस्तूसह केला.

पूजेनंतर मुख्यमंत्री म्हणाले, विठ्ठल-रुक्मिणीच्या चरणी नतमस्तक होत राज्यातील शेतकरी, कष्टकरी आणि सर्व जनतेच्या सुख-समृद्धी व महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी प्रार्थना केली.

Ashadhi Ekadashi 2025 प्रतिपंढरपूरात उपमुख्यमंत्री शिंदेंचा सहभाग

दुसरीकडे मुंबईतील वडाळा येथील विठ्ठल मंदिरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अभिषेक आणि पूजा सोहळा पार पडला. त्यांच्या सोबत पत्नी, आमदार प्रसाद लाड, आमदार कालिदास कोळंबकर आणि शिवसेना नेत्या शीतल म्हात्रेही उपस्थित होते. हे विठ्ठल मंदिर सुमारे 400 वर्षांपूर्वीचे असून, वडाळा परिसरातील भाविकांसाठी पंढरपूरचा प्रतीकरूप ठिकाण मानले जाते. मंदिर ट्रस्टी उदय दिघे यांनी सांगितले की, एकदा वडाळ्यातील वारकरी पंढरपूर वारीवर गेले असता, चंद्रभागा नदीत स्नान करताना त्यांना विठ्ठलाची मूर्ती मिळाली. ती मूर्ती वडाळ्यात आणून येथे मंदिराची स्थापना करण्यात आली.पंढरपूरला प्रत्यक्ष जाणं शक्य नसलेल्या भक्तांसाठी हे मंदिर “प्रतिपंढरपूर” म्हणून ओळखलं जातं आणि आषाढी एकादशीला येथेही मोठ्या भक्तिभावाने पूजा-अर्चा केली जाते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img