अहिल्यानगर शहराच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. प्रखर हिंदुत्वाची भूमिका घेणारे शहराचे आमदार संग्राम जगताप यांना (MLA Sangram Jagtap) जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. जगताप यांचे स्वीय सहाय्यक सुहास शिरसाट यांच्या मोबाइलवर धमकीचा मेसेज पाठवण्यात आला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता तत्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. यानंतर कोतवाली पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
संग्राम जगताप यांचे खासगी स्वीय सहायक सुहास शिरसाठ यांच्या मोबाइलवर धमकीचा मेसेज पाठवण्यात आला होता. या मेसेजमध्ये ‘संग्राम को दो दिन के अंदर खत्म करुंगा’ असा मजकूर लिहिलेला होता. संग्राम जगताप यांनी हिंदुत्वाची भूमिका घेतली आहे. हिंदू समाजाची बाजू आमदार जगताप अतिशय हिरीरीने मांडत आहेत. अशातच त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली आहे.