डिलिव्हरीच्या नावाखाली नराधमाने 25 वर्षीय मुलीवर बलात्कार (Rape Case) केल्याचा प्रकार शिक्षणाचे माहेर घर असणाऱ्या पुण्यातून समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने अत्याचारानंतर पीडितेच्या मोबाईलमध्ये सेल्फी (Selfi) काढला आणि त्यात परत येईल असा मेसेज लिहिल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, कोंढवा परिसराती एका उच्चभ्रू सोसायटीत हा प्रकार बुधवारी (दि.2) संध्याकाळी साडेसातच्या सुमारास घडला आहे.
Rape Case नेमकं काय घडलं?
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पीडित तरूणी ही मुळची अकोल्याची असून, पुण्यातील एका खासगी कंपनीत ती काम करते. पीडित तरूणी तिच्या भावासोबत कोंढवा परिसरात वास्तव्यास आहे. मात्र, ती घरात भाऊ गावाला गेल्याने एकटीच होती.
बुधवारी संध्याकाळी सात ते साडे सात वाजण्याच्या सुमारास आरोपीने कोंढव्यातील एका उच्चभ्रू सोसायटीत कुरिअर बॉय असल्याचे सांगत प्रवेश मिळवला. घराची बेल वाजवत त्यानंतर त्याने पीडितेच्या कुरिअर आले असल्याचे सांगितले. त्यावेळी हे पार्सल माझे नाही असे सांगितले. पण त्यानंतरही तुम्हाला सही करावी लागेल असे आरोपीने सांगितले. त्यामुळे पीडितेने सही करण्यासाठी सेफ्टी डोअर उघडला.
Rape Case दरवाजा उघडताच आरोपीने संधी साधली
पीडित तरूणीने सेफ्टी डोअर सही करण्यासाठी म्हणून उघडला असता आरोपीने संधी साधली आणि त्याने तरूणीच्या तोंडावर स्प्रे मारला. त्यानंतर आरोपीने पीडितेवर बलात्कार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. आरोपी एवढ्यावरच न थांबता त्याने पीडितेच्या मोबाईलवर सेल्फी काढला आणि ‘मी परत येईल’ असा मेसेजही टाईप करून ठेवला. कोंढवा पोलिस ठाण्यात या घटनेनंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस करत आहेत.
Rape Case महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
भर संध्याकाळी आणि उच्चभ्रू सोसायटीत अत्याचाराची घटना घडल्याने महिलांच्या सुरक्षेसोबतच सर्वसामान्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, आरोपीवर दोन घटनांमध्ये ‘इन्स्टाग्राम’वर ओळख वाढवून लैंगिक छळ केल्याप्रकरणी भारती विद्यापीठ आणि खराडी पोलिसांत गुन्हे दाखल असल्याचे समजते. तर, आणखी एका प्रकरणात 19 वर्षीय पीडितेवर आरोपीने ‘इन्स्टाग्राम’वर ओळख वाढवून लग्नाचे आमिष दाखवत तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि काही फोटोही काढल्याचा आरोप आहे.