20.4 C
New York

India Pakistan Tension : पाकिस्तानी सेलिब्रिटींना दणका! फक्त 24 तासांत सोशल मीडिया खात्यांवर भारतात पुन्हा बंदी

Published:

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी (Pahalgam Attack) हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील (India Pakistan Tension) संबंध अतिशय खराब झाले आहेत. यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून (Operation Sindoor) बदला घेतला होता. याच दरम्यान पाकिस्तानी सेलिब्रिटींचे सोशल मीडिया अकाउंट भारतात बंद करण्यात आले होते. काल या अकाउंटवरील बंदी मागे घेतल्याचे प्रतीत होत होते. कारण काही तासांसाठी या लोकांचे सोशल मीडिया अकाउंट दिसत होते. मात्र, एक दिवसांनंतर म्हणजे आज (गुरुवार) हे अकाउंट पुन्हा बंद झाले आहेत. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी, अभिनेत्री हानिया अमीर यांच्यासह अनेक सेलिब्रिटींचा या यादीत समावेश आहे.

पाकिस्तानी सेलिब्रिटींचे सोशल मीडिया अकाउंट बुधवारी भारतात दिसत होते. या खात्यांवरील बंदीचा निर्णय मागे घेण्यात आल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र गुरुवारपासून अकाउंट दिसणे बंद झाले आहे. शाहिद अफरीदी, फवाद खान, माहिरा खान, हानिया अमीर यांचे अकाउंट सर्च केल्यानंतर भारतात हे अकाउंट उपलब्ध नाहीत असा मेसेज स्क्रिनवर दिसत आहे. या प्रकरणी सरकारकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

पाकिस्तानी अभिनेत्री हानिया अमीरने भारतीय कलाकार दिलजीत जोसांझ बरोबर सरदारजी 3 या सिनेमात काम केलं आहे. परंतु, यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. हानियाचे सोशल मीडिया अकाउंट भारतात बॅन आहे. याचबरोबर माहिरा खान, फवाद खान, शाहिद अफरीदी, मावरा होकेन, सबा कमर आणि अली जफर यांच्यासह अनेक पाकिस्तानी सेलिब्रिटींचे अकाउंट भारतात दिसत नाहीत.

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात अनेक भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला होता. अतिरेक्यांनी भारतीयांना त्यांचा धर्म विचारून गोळ्या घातल्या. यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून 100 पेक्षा जास्त अतिरेक्यांचा खात्मा केला होता. याच दरम्यान पाकिस्तनने भारतातील काही शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. भारतीय सैन्याने पाकिस्तानचे सगळेच हल्ले परतवून लावले होते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img