26.2 C
New York

Sanjay Raut : शक्तीपीठ महामार्गावरून… संजय राऊतांचा गंभीर आरोप, म्हणाले

Published:

शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला कॅबिनेट बैठकीत मंजुरी मिळाली असून यासाठी 20 हजार कोटींची तरतूद होणार आहे. शक्तीपीठ महामार्ग साडेतीन शक्तिपीठ, दोन ज्योतिर्लिंग, पंढरपूर आणि आंबेजोगाईसह हा 18 तीर्थक्षेत्रांना जोडणार आहे. यासाठी 27 हजार 500 एकराची जमीन 12 जिल्ह्यातील हस्तांतरित केली जाणार आहे. आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या शक्तीपीठ महामार्गावरुन टीका केली आहे.

खासदार संजय राऊत यांनी नुकतंच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाराष्ट्राची फार कठीण अवस्था आहे. सध्या महाराष्ट्राची लूट सुरु आहे, असे म्हटले. शक्तीपीठ महामार्गासाठीचे १० हजार कोटी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी वापरले जातील, असा गंभीर आरोप संजय राऊतांनी केला.

Sanjay Raut जगातील कोणत्याही घोटाळ्यांसोबत तुलना नाही

“जेवढे घोटाळे महाराष्ट्रात सुरु आहेत, जगातील कोणत्याही घोटाळ्यांसोबत त्याची तुलना होणार नाही. अत्यंत हाय लेव्हलचा घोटाळा सुरु आहे. १९ दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस, अजित पवारांच्या उपस्थितीत समृद्धीचे उद्घटान झाले. इगतपुरी ते आमने या ठिकाणची आजची परिस्थिती पाहा. सर्व ठिकाणी खड्डे पडले आहेत. हा ड्रीम प्रोजेक्ट होता. पण ५० टक्के घोटाळा आताही या ड्रीम प्रोजेक्टमध्ये आहे. या ड्रीम प्रोजेक्टचा अर्धा पैसा निवडणुकीत मत विकत घेण्यासाठी, आमदार खासदार विकत घेण्यासाठी, शिवसेना आणि काँग्रेसची लोक विकत घेण्यासाठी हा सर्व पैसा ठेकेदारांकडून बाहेर आला आणि तो खर्च झाला”, असे संजय राऊत म्हणाले.

Sanjay Raut फक्त ठेकेदाराला दोषी धरुन चालणार नाही

“आता हे शक्तीपीठ महामार्गाच्या मागे लागले आहेत. यासाठी २० हजार कोटी मंजूर झाले आहेत. त्यातले किमान १० हजार कोटी बाहेर येतील. जसे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारसंघाच्या निवडणुकीत MMRDA चे ३ हजार कोटी आले आणि हे पैसे ठेकेदारांकडून वापरले जातील. हे सर्व ड्रीम प्रोजेक्ट ठेकेदारांकडून हजारो कोटी काढण्यासाठी चालले आहेत. याचा किती फायदा महाराष्ट्राला आहे की नाही, हा प्रश्न पुढचा आहे. आपले खिसे सर्वात आधी भरा, महाराष्ट्राच्या राजकारणाला आपल्या बॅगा भरा आणि त्या पैशातून ब्लॅक मनीतून खरेदी विक्री सुरु करा. समृद्धी महामार्गासंदर्भात फक्त ठेकेदाराला दोषी धरुन चालणार नाही. त्या संबंधित मंत्र्‍यांना ताबडतोब मंत्रिमंडळातून काढायला हवं”, अशी मागणी संजय राऊतांनी केली.

Sanjay Raut महाराष्ट्राची लूट सुरु

“ही सर्व कमिशनबाजी सुरु आहे. माळेगाव कारखान्याला ५०० कोटी देणार आहेत, कुठून आणणार ५०० कोटी, एका कारखान्याला तुम्ही ५०० कोटी देणार. त्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे २० दिवस गावात खुर्ची टाकून बसतात. काय चाललंय या महाराष्ट्रात, फार कठीण अवस्था आहे. महाराष्ट्राची लूट सुरु आहे”, असा आरोप संजय राऊतांनी केला.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img