28.1 C
New York

Gold Prices : सोन्याने गाठला ऐतिहासिक उच्चांक! दर थेट एक लाखाच्या पुढे, आजचे भाव काय?

Published:

सोन खरेदी (Gold Prices) करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. सोन्याची बुलेट ट्रेन वेगाने धावतेय. सोनं थेट एक लाखाच्या पुढे गेलंय. प्रति 10 ग्रॅम सोन्याची किंमत आता 1 लाख 403 रूपयांवर पोहोचली आहे. भारतात सोनं का महागलं? (Investment) असा प्रश्न पडतोय. तर रूपया कमजोर झाला अन् जागतिक सोन्याच्या किमती (Business News) वाढल्या. त्यामुळे भारतात सोनं महागलं आहे. याचा परिणाम थेट खरेदीवर झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे.

Gold Prices भारतात सोनं का महागलं?

एक लाख रूपयांची पातळी पार होणे, ही आर्थिक आणि मानसिक दृष्ट्या एक मोठी मर्यादा मानली जाते. त्यानंतर 1 तोळा सोन्याने एक लाख चारशे तीन रूपयांची किंमत पातळी गाठल्याने, ही एक इतिहासिक घटना ठरली (Money) आहे. रुपया कमजोर झाल्याने आणि जागतिक बाजारात सोन्याच्या किमती वाढल्या आहेत. भारतात याचा परिणाम दिसून येतोय. बाजारात अशी वाढ झाल्याने स्थानिक ग्राहकांची मागणी कमी होते.

Gold Prices खरेदीचे प्रमाण घटले

गेल्या महिन्यातही सोन्याच्या किमती जवळ जवळ 98,000 ते 99,000 हजार रूपयाच्या दरम्यान झाल्या आणि ती वाढल्या आहेत. सोने हा सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय समजला जातो; पण महागाई आणि भांडवली बाजाराचे बदल यांचा सतत प्रभाव राहणार आहे. सोनं महाग झाल्यामुळे ग्राहक आणि ज्वेलर्स दोघांचेच खरेदीचे प्रमाण घटले आहे. काही विक्रेते सवलत देत आहेत, पण त्यावरही मागणी स्थिर नाही.

Gold Prices चांदीच्या किमती

लग्नसराईच्या हंगामात, सोन्याची चमक बुलेट ट्रेनच्या वेगाने पळत आहे. 13 जून रोजी सराफा बाजार सुरू झाल्यानंतर, सोन्याच्या किमतीत प्रति 10 ग्रॅम 850 रुपयांची वाढ झाली आहे. दुसरीकडे चांदीच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. कर आणि उत्पादन शुल्कामुळे सोने आणि चांदीच्या किमती दररोज चढ-उतार होत राहतात. सोने खरेदी करण्यापूर्वी त्याची शुद्धता तपासणे आवश्यक आहे. सोन्याची शुद्धता कॅरेटमध्ये मोजली जाते. 24 कॅरेट सोने सर्वात शुद्ध मानले जाते. सोने खरेदी करताना हॉलमार्क देखील तपासणे आवश्यक आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img