19.4 C
New York

Mumbai Corona : मुंबईला पुन्हा कोरीनाची धास्ती, मास्क लावायची ठेवा तयारी

Published:

काही वर्षांपूर्वी कोरोनाने संपूर्ण जगभरात थैमान घातले होते. (Mumbai Corona) त्यानंतर आता कुठे संपूर्ण जग यामधून सावरले असून आता पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढल्याचे दिसून येत आहे. हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता दोन्ही देशांमध्ये निर्बंध लावण्यात येण्याची शक्यता आहे. तसेच, हाँगकाँग आणि सिंगापूरनंतर आता मुंबईतही कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचे सांगण्यात येत आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आता मुंबईतही पुन्हा मास्क लावण्याची सक्ती होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, सध्याच्या रुग्णांची लक्षणे सौम्य आहेत. 2020 ते 2022 या काळात जगात हाहाकार माजवणाऱ्या आणि लाखो लोकांचा बळी घेणाऱ्या कोरोनाने पुन्हा डोकं वर काढले आहे. कोरोनाची साथ पुन्हा एकदा आली आहे, पण हा कोरोनाचा व्हेरिंयट तितका गंभीर नसल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. कोरोना पुन्हा आला असला तरी घाबरण्याचे कारण नसल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. कोरोनाची लक्षणे दिसल्यास घाबरून न जाता उपाय योजना कराव्यात, असेही आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे. केंद्रीय मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, शनिवारी (17 मे) देशात 93 कोरोनाचे सक्रीय रूग्ण आढळले. मुंबईमध्ये महिन्याला 10 ते 12 रूग्ण आढळतात.

मुंबई महानगर पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी सांगितले की, कोरोनाबाबत सध्या काळजी करण्याचे कारण नाही. कोरोना आपल्यामध्येच राहणार आहे, तो संपणार नाही. त्यामुळे घाबरण्यापेक्षा काळजी घ्यावी. बीएमसीच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने डॉक्टरांना तापाच्या रुग्णांबाबत सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुंबई महापालिकेतील सर्दी आणि तापाच्या रूग्णांकडे विशेष लक्ष देण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. शनिवारी (17 मे) ब्रीच कँडी रूग्णालयात कोरोनाचे दोन रूग्ण आढळले. याबाबत ब्रीच कँडी रुग्णालयाचे डॉ. हेमंत ठक्कर यांनी सांगितले की, शनिवारी सकाळी दोन रुग्णांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली. हाँगकाँग आणि सिंगापूरच्या दाट लोकवस्तीच्या भागात कोविडच्या नव्या लाटेच्या बातम्या येत आहेत. अशामध्ये एका रुग्णाला लंडनहून परतल्यानंतर घसा खवखवत होता तसेच प्रचंड खोकला येत होता. दुसऱ्या रुग्णाला तात्काळ प्रवासाचा इतिहास नसल्याचेही त्यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img