24.4 C
New York

Kareena Kapoor : करीना कपूर भावूक झाली? व्हायरल व्हिडीओमुळे चाहत्यांमध्ये चिंता

Published:

बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) हिची ओळख आता केवळ तिच्या नावानेच पुरेशी आहे. बॉलिवूडमध्ये दोन दशकांहून अधिक काळापासून सक्रीय असलेल्या करीनाने अनेक गाजलेले चित्रपट दिले आहेत. तिच्या सौंदर्याचं, अभिनयाचं आणि खास स्टाईलचं वेड प्रेक्षकांमध्ये आजही तेवढंच आहे, जितकं ते 90 च्या दशकात होतं.

अलीकडेच करीनाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत ती तिच्या गाडीत बसलेली असून डोळे पुसताना दिसत आहे. चाहत्यांनी हा व्हिडीओ पाहताच तिच्या प्रकृतीबद्दल किंवा भावनिक स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. अनेकांनी कमेंट करत लिहिलं आहे की, “करीना स्मार्टली तिचे अश्रू लपवत आहे,” तर काहींनी तिला धीर देणाऱ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडीओ अभिनेत्री सोनम कपूरच्या वाढदिवसाच्या पार्टीनंतरचा आहे. पार्टीनंतर करीना कारमध्ये परतताना काहीशा भावूक अवस्थेत दिसली. त्यामुळे ती का अश्रू ढाळत होती, याचे कारण मात्र स्पष्ट झालेलं नाही.

करीना कपूर खान तिच्या प्रोफेशनल कामांपेक्षा अधिक वेळा तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. ती अनेकदा मुलाखतींमध्ये आपल्या वैयक्तिक आयुष्यातील अनुभव शेअर करत असते. अभिनेत्रीने तिच्या फिटनेसबद्दल सुद्धा अनेक वेळा खुल्या मनाने बोललं आहे आणि अनेक महिलांसाठी ती प्रेरणा ठरली आहे. 44 व्या वर्षीही करीनाचा फॅशन सेन्स, तिची त्वचा आणि फिटनेसने अनेक चाहत्यांना आकर्षित केलं आहे. सोशल मीडियावर ती प्रचंड सक्रिय असून तिच्या प्रत्येक फोटो आणि व्हिडीओला तुफान प्रतिसाद मिळतो.

‘नो फोटो पॉलिसी’मागचं कारण

पूर्वी करीना तिचे दोन्ही मुल तैमूर आणि जेह यांच्यासोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करायची. मात्र जानेवारी महिन्यात त्यांच्या कुटुंबावर झालेल्या एका संभाव्य हल्ल्याच्या घटनेनंतर करीनाने आणि सैफ अली खानने त्यांच्या मुलांसाठी ‘नो फोटो पॉलिसी’ जाहीर केली. त्यानंतर करीनाचे कुटुंबीय फोटो सार्वजनिक प्लॅटफॉर्मवर दिसणं जवळपास बंद झालं आहे.

करीना कपूर खानचा एक भावूक क्षण सोशल मीडियावर व्हायरल होत असल्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये चिंता पसरली आहे. अभिनेत्रीचे हे अश्रू कोणत्या कारणामुळे आले, हे जरी स्पष्ट नसलं तरी तिच्या चाहत्यांनी तिला प्रेमाने घेरलं आहे. करीना केवळ एक अभिनेत्री नसून ती अनेकांसाठी आदर्श आहे. खासगी आयुष्य, फिटनेस आणि फॅशनबाबत!

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img