9.4 C
New York

Nitesh Rane : राऊतांनी पूर्ण पुस्तक लिहिलं तर उद्धव ठाकरे त्यांना नरकात पाठवतील, नितेश राणेंची टीका

Published:

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) लिहिलेल्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाचं उद्या (दि. १७ मे) मुंबईत प्रकाशन होणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक आणि चित्रपट पटकथालेखक जावेद अख्तर (Javed Akhtar) यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन केलं जाणार आहे. दरम्यान, या पुस्तकावर आता भाजप नेते आणि मंत्री नितेश राणेंनी (Nitesh Rane) भाष्य केलं. या पुस्तकातील काही पानं लिहायची राहिली असतील, राऊतांनी पूर्ण पुस्तकं लिहिलं तर उद्धव ठाकरे त्यांना नरकात पाठवतील, अशी टीका राणेंनी केली.

निलेश राणे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. राऊतांच्या पुस्तकाविषयी विचारलं असता राणे म्हणाले, या पुस्तकातील काही पाने लिहायची राहिली असतील. कारण सजंय राऊत हे जेलमध्यs असताना किंवा केस चालू असताना त्यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबाला ज्या-ज्या शिव्या दिल्यात, त्याचा उल्लेख पुस्तकात करायला विसरले. जेलमध्ये असताना ज्यांच्या समोर त्यांनी शिव्या दिल्या आहेत, उद्धव ठाकरेंची जी काही लायकी ते इतरासंमोर बोलताना काढायचे, त्याची जी काही माहिती आमच्याकडे आलीये, त्या बाबतीतही उल्लेख करा पुस्तकात, असं आवाहन राणेंनी राऊतांना केलं.

नुसते प्रेम बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंविषयी प्रेम का दाखवता, असा सवालही राणेंनी केला. उद्धव ठाकरेंची लायकी, त्यांच्या कुटुंबाला शिव्या, यांना पोहोचून दाखवतो, असं सांगण्याची मजल या संजय राऊतची गेली होती. मग का त्या पुस्तकात त्याचा उल्लेख केलेला नाही? अर्ध, अपुरे पुस्तक लिहू नये. पूर्ण पुस्तक काढा, मग त्याला नरकात पोहोचवण्याचं काम उद्धव टाकरेच करतील, असं राणे म्हणाले.

Nitesh Rane फडणवीस काय म्हणाले?

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राऊतांच्या या पुस्तकावर टोला लगावला. कथा, कादंबऱ्या किंवा बालवाङ्मय वाचण्याचं माझं वय राहिलेलं नाही. त्यामुळं मी असल्या गोष्टी वाचत नाही, अशी खोचक टीका फडणवीसांनी केलं.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img