https://www.mumbaioutlook.com/wp-content/uploads/2024/04/cropped-author6.jpg

18.7 C
New York

Tanot Mata Temple : पाकिस्तानी सैन्याचे ४५० बॉम्ब पचवणारे राजस्थानातील मंदिर आहे एक चमत्कार

Published:

भारत-पाकिस्तान हे दोन्ही देश पुन्हा एकदा एका मोठ्या युद्धाच्या उंबरठ्यावरून परतले आहेत. तूर्तास युद्ध टळले असले तरी दोन्ही देशांतील तनाव अजूनही कायम आहे. ६ मे च्या मध्यरात्री भारताने ऑपरेशन सिंदूर राबवल्यानंतर पाकिस्तानने सीमावर्ती राज्यांमध्ये ड्रोन हल्ले केले. यात राजस्थानातील एक शहर होते जैसलमेर. पाकिस्तानच्या सीमेवर असलेले ही शहर भारत आणि पाकिस्तानच्या प्रत्येक युद्धात पाकिस्तानी सैन्याकडून लक्ष्य केले गेले आहे. पण, आश्चर्याची गोष्ट म्हणजे जैसलमेर शहरात असलेले एक मंदिर (Tanot Mata Temple)पाकिस्तानच्या प्रत्येक हल्ल्यापासून वाचले आहे. अगदी १९६५ च्या युद्धात या मंदिराच्या परिसरात ४५० बॉम्ब पाकिस्तानी सैन्याने टाकले, पण त्यातील एकही बॉम्ब फुटला नव्हता. कोणते आहे ही मंदिर आणि पाकिस्तानी हल्ल्यातून ते कसे वाचले, हेच आज आपण जाणून घेणार आहोत.

८-९ मे २०२५ च्या रात्री राजस्थानातील जैसलमेर जिल्ह्यातील भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानकडून जोरदार गोळीबार झाला. क्षेपणास्त्रे डागण्यात आली, जी भारतीय हवाई संरक्षण प्रणाली S-400 ने हवेतच नष्ट केली. याच जैसलमेर शहरापासून १२२ किलोमीटर अंतरावर ९ व्या शतकातील तनोट मातेचे मंदिर आहे. ही मंदिर म्हणजेच एक सुरक्षा यंत्रणा आहे.भारत-पाक सीमेवरील राजस्थानमधील तनोट हे शेवटचे गाव. या गावातच तनोट मातेचे मंदिर आहे. तनोट राय मंदिराची स्थापना ९ व्या शतकात ८२८ साली राजा तांबूल राव यांनी केली. राजस्थानमधील थार वाळवंटातील धगधगत्या वाळूच्या मध्यभागी असलेले तनोट माता मंदिर हे केवळ एक पौराणिक धार्मिक स्थळ नाही तर ते भारताच्या लष्करी वैभवाचे प्रतीक देखील बनले आहे. हे मंदिर हिंगलाज मातेचे एक रूप असलेल्या तनोट राय मातेला समर्पित आहे. स्थानिक जमातींनी अनेक शतकांपूर्वी त्याची स्थापना केली होती. पौराणिक कथेनुसार, या भागातील स्थानिक जमाती तनोट राय मातेला त्यांची कुलदेवी मानत असत आणि तिच्या आशीर्वादासाठी हे मंदिर स्थापन करण्यात आले होते. सर्वात जुन्या चरण साहित्यानुसार, तनोट माता ही दैवी देवी हिंगलाज मातेचा अवतार आहे आणि म्हणूनच ती युद्धाची देवी मानली जाते.कालांतराने, हे मंदिर राजस्थान आणि देशभरातील भाविकांसाठी श्रद्धेचे मुख्य केंद्र बनले.

हे मंदिर १९६५ आणि १९७१ च्या भारत-पाक युद्धांदरम्यानच्या आश्चर्यकारक चमत्कारांसाठी प्रसिद्ध झाले. तनोट माता मंदिर ट्रस्टच्या वेबसाइटनुसार, १९६५ च्या युद्धात पाकिस्तानने तनोट माता संकुलात सुमारे ३,००० बॉम्ब टाकले होते, त्यापैकी ४५० बॉम्ब मंदिर संकुलात पडले. आश्चर्याची बाब म्हणजे या ४५० बॉम्बपैकी एकही बॉम्ब फुटला नाही. मंदिर पूर्णपणे सुरक्षित राहिले, तर आजूबाजूला प्रचंड विनाश झाला. तनोट माता मंदिर संकुलात अजूनही अनेक जिवंत बॉम्ब आहेत. भारतीय सैनिक तनोट मातेची पूजा करतात. भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान बॉम्ब फुटला नाही या चमत्कारानंतर, श्री तनोट राय माता यांना सैन्याची आणि विशेषतः सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांची पूजनीय देवी मानले जाते.

१९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान तनोटवर पुन्हा हल्ला झाला. परंतु यावेळी हल्ला करणारे पाकचे रणगाडे वाळूत अडकले, ज्यामुळे भारतीय हवाई दलाला ते नष्ट करता आले. १९७१ च्या युद्धानंतर, भारतीय सैन्याने लोंगेवालाच्या युद्धातील विजयाच्या स्मरणार्थ मंदिराच्या आवारात विजय स्तंभ बांधला आहे. भारतीय सैन्याच्या १२० पायदळ सैनिकांच्या एका कंपनीने २००० पाकिस्तानी सैनिकांच्या तुकडीचा पराभव केला ज्यामध्ये पाकिस्तानी टँक स्क्वॉड्रन देखील होते. १९७१ च्या पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात भारताच्या विजयानंतर, भारताच्या सीमा सुरक्षा दलाने मंदिराचा विस्तार केला. विजय बुरुज आणि न फुटलेले पाकिस्तानी बॉम्ब आणि रणगाडे असलेले युद्ध संग्रहालय येथे बांधले. दरवर्षी १६ डिसेंबर हा दिवस मंदिरात विजय दिवस म्हणून साजरा केला जातो.

तनोटच्या सीमावर्ती भागात असलेले हे मंदिर केवळ धार्मिक भक्तीचे प्रतीक नाही तर सैनिकांसाठी आत्मविश्वासाचा स्रोत आहे, देशभक्ती आणि सुरक्षिततेचे प्रतीक देखील आहे. सध्या मंदिराची देखभाल ऑपरेशन तनोट राय आणि घंटियाली माता ट्रस्टद्वारे केली जाते, ज्यामध्ये बीएसएफची सक्रिय भूमिका आहे. मंदिराची पूजा आणि व्यवस्थापनाची जबाबदारी देखील सीमा सुरक्षा दलाच्या जवानांवर आहे. इतिहासाची पुनरावृत्ती घडून याहीवेळी १९६५ आणि १९७१ प्रमाणे हे मंदिर आणि जैसलमेर शहर पाकिस्तानच्या हल्ल्यांपासून सुरक्षित राहिले. आता हा मातेचा चमत्कार म्हणा किंवा योगायोग पण दोन मोठ्या युद्धांत तनोट मातेने जैसलमेरवासीयांचे रक्षण केले. आता यही युद्धात मातेचे मंदिर आणि जैसलमेर शहर सुरक्षित राहिले

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img