17 C
New York

SSC Result 2025 : प्रतिक्षा संपली, उद्या जाहीर होणार दहावीचा निकाल

Published:

दहावी आणि बारावी ही शैक्षणिक आयुष्यातील दोन महत्त्वाचे वर्ष असतात. त्यामुळे ही परीक्षा दिल्यानंतर ती पास होतो की नाही आणि पास झालोच तरी किती गुण मिळतात? याची धाकधूक विद्यार्थ्यांसोबतच पालकांनाही असतेच. नुकताच बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. त्यामुळे दहावीचा निकाल कधी जाहीर होणार? असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. पण आता 10 वीचा (SSC Result 2025)  निकालाची तारीख महाराष्ट्र शिक्षण मंडळाकडून जाहीर करण्यात आली आहे. उद्या, मंगळवारी, 13 तारखेला 10 वीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. दुपारी 1 वाजता विद्यार्थ्यांना ऑनलाइन स्वरुपात हा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

कुठे पाहाल निकाल?

https://results.digilocker.gov.in

https://sscresult.mahahsscboard.in

http://sscresult.mkcl.org

https://results.targetpublications.org

उद्या दुपारी 1 वाजता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल पाहता येईल.महाराष्ट्र बोर्डानं यंदा अकरावीची संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनं करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबची माहिती बोर्डानं एक प्रसिद्धीपत्रक जारी करून यापूर्वीच दिली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img