19.3 C
New York

Sanjay Raut : आमचे दुर्दैव की आम्हाला मोदींसारखे नेतृत्व लाभले, राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल

Published:

भारत-पाकिस्तान या देशांमध्ये वाढलेल्या तणावात अमेरिकेने मध्यस्थी केली. ज्यानंतर भारत-पाकमध्ये युद्धबंदीचा निर्णय घेण्यात आला. पण भारताच्या या निर्णयावरून अनेक भारतीयांनी काही राजकीय नेतेमंडळींनी नाराजी व्यक्त केली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी याच मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खरं तर राजीनामा दिला पाहिजे. पण त्यांनी हा निर्णय का घेतला? हे सुद्धा सांगितले पाहिजे, अशी मागणी राऊतांनी केली आहे. त्याशिवाय, आमचे दुर्दैव आहे की आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे नेतृत्व मिळाले, असे म्हणत राऊतांनी पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र डागले आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी रविवारी (ता. 11 मे) प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी करून केंद्र सरकार पाकिस्ता की भारतातील लाडक्या उद्योगपतीला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. केंद्र सरकारने ट्रम्प यांची मध्यस्थी स्वीकारली, पण ट्रम्प आहेत कोण? यामध्ये भारताचे नुकसान झाले आहे. जम्मू-काश्मारीतील राजौरी, पूँछचे या गावांचे नुकसान झाले आहे. पाकिस्तानच्या हल्ल्यात 20 नागरिक ठार झाले आहेत. ट्रम्प यांची मध्यस्थी जगात मान्य केली जात असेल तर त्यांनी इस्रायल आणि गाझातील युद्ध का थांबवले नाही? गाझा पट्टीमध्ये लहान मुलं, वृद्ध, महिला बेचिराख झाले. एक देश उद्ध्वस्त केला आणि ट्रम्प हे ठामपणे इस्रायलच्या मागे उभे राहिले. पण मोदींचे मित्र ट्रम्प भारताच्या पाठीशी उभे राहिले नाही, असे यावेळी राऊतांनी म्हटले.

तसेच, 26 महिलांचे कुंकू पुसणारे 6 दहशतवादी कुठे आहेत? जोपर्यंत या 6 दहशतवाद्यांचा खात्मा होत नाही तोपर्यंत ‘ऑपरेशन सिंदूर’ पूर्ण होणार नाही. आमचे दुर्दैव आहे की, आम्हाला मोदींसारखे नेतृत्व मिळाले आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षातील लोकांनी मोदींचा राजीनामा मागितला पाहिजे. मोदींना पदावर राहण्याचा अधिकार नाही. त्यांनी देशाचा विश्वासघात केला आहे. सगळ्यात आधी अमित शहांचा राजीनामा मागायला पाहिजे. पहलगाम येथे हल्ला करणारे 6 अतिरेकी आजही सापडलेले नाहीत. अमित शहा गृहमंत्री असताना 26 महिलांचे कुंकू पुसले गेले. शहांना पदावर राहण्याचा अधिकार नाही. मोहन भागवत राष्ट्रभक्त असतील तर त्यांनी शहा यांचा राजीनामा मागायला पाहिजे, अशी मागणीच यावेळी खासदार संजय राऊत यांनी केली.

जगामध्ये भारताचा मित्र नाही. मोदी 200 देश फिरून आले, पण भारताचा मित्र कोण आहे, हे त्यांनी सांगावे. जगभरात मिठ्या मारत फिरणाऱ्या मोदींनी ठामपणे या युद्धात भारताला पाठिंबा देणारा, भाताच्या बाजुने उभा राहिलेला देश दाखवावा. मोदी जपान, रशियाचे नाव घेतील, पण ज्या प्रमाणे चीन, तुर्कीने पाकिस्तानला खुला पाठिंबा दिला तसा आपल्याला पाठिंबा देणारा देश त्यांनी दाखवावा. तटस्थ राहणे म्हणजे पाठिंबा नाही, असे यावेळी राऊतांकडून सांगण्यात आले.

Sanjay Raut इंदिरा गांधी असत्या तर…

आज इंदिरा गांधी यांची आठवण येत आहे, असे म्हणत खासदार राऊत म्हणाले की, तुम्ही पाहिले असेल सोशल मीडियावर सध्या इंदिरा गांधींच्या निर्णयाची चर्चा होत आहे. 1971 साली इंदिरा गांधी यांनी अमेरिकेचा दबाव झुगारून लावला होता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा इंदिरा गांधी यांनी सांगितले होते की, आमच्यामध्ये हस्तक्षेप करणारे तुम्ही कोण आहात. आम्ही एक सार्वभौम, स्वतंत्र राष्ट्र आहोत. तुम्हाला अधिकार नाही. तुम्ही हवा तो निर्णय घ्या. तुम्ही पाकिस्तानला मदत करा किंवा काही करा. आम्ही पाकिस्तान बरोबर युद्ध पुकारलेले आहे आणि ते टोकाला नेणार. इदिरा गांधी यांनी युद्ध टोकाला नेले आणि पाकिस्तानचे दोन तुकडे केले, अशी आठवण यावेळी राऊतांकडून सांगण्यात आली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img