9.9 C
New York

Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती ‘हिटमॅन’चा गौरवशाली प्रवास संपला

Published:

भारतीय कसोटी संघाचा कर्णधार (Indian test captian) आणि अनुभवी फलंदाज रोहित शर्माने (rohit sharma )७ मे रोजी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असून, क्रिकेटविश्वात आणि चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. इंग्लंड (England) दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर त्याचं कर्णधारपद बाजूला होण्याची चर्चा सुरु असतानाच रोहितने थेट कसोटी क्रिकेटमधूनच निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. इंस्टाग्राम स्टोरीद्वारे त्याने आपल्या निवृत्तीची घोषणा केली आणि टीम इंडियाची टोपी दाखवणारा फोटो शेअर करत भावना व्यक्त केल्या.

रोहितने निवृत्तीच्या घोषणेमध्ये रोहित म्हणतो, “भारतीय संघासाठी कसोटी क्रिकेट खेळणं हा माझ्यासाठी सन्मान होता. गेल्या अनेक वर्षांत मिळालेल्या प्रेमासाठी आणि पाठिंब्यासाठी मी तुमचा आभारी आहे.” तसेच त्याने स्पष्ट केलं की, तो एकदिवसीय क्रिकेट खेळत राहणार आहे. कसोटी क्रिकेटमधून रोहित शर्माची एक यशस्वी आणि आठवणीत राहणारी कारकीर्द संपली असली, तरीही ‘हिटमॅन’ (Hitman) अजूनही मैदानावर वनडे स्वरूपात आपली जादू दाखवत राहणार आहे. रोहितच्या निवृत्तीमुळे भारतीय कसोटी संघाला नवा कर्णधार मिळणार असून, त्याचं स्थान भरून काढणं निश्चितच मोठं आव्हान असेल.

रोहित शर्मा, जो त्याच्या आक्रमक शैलीसाठी ‘हिटमॅन’ म्हणून प्रसिद्ध आहे, त्याने २०१३ मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्याच सामन्यात दोन शतके ठोकत त्याने आपली प्रतिभा सिद्ध केली. त्यानंतर काही काळ अपयश आणि दुखापतीमुळे संघाबाहेर राहावं लागलं, पण २०१९ मध्ये सलामीवीर म्हणून त्याची पुनरागमनाची खेळी प्रभावी ठरली. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सलग तीन शतकांनी त्याने आपलं स्थान पक्कं केलं. २०२१ मध्ये विराट कोहलीनंतर (Virat kohli) रोहितला कसोटी संघाचं नेतृत्व मिळालं. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने घरच्या मैदानावर तसेच परदेशातही काही महत्त्वाच्या कसोटी मालिका जिंकल्या. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यापर्यंत त्याने संघाचं नेतृत्त्व केलं.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img