21.7 C
New York

Operation Sindoor : कुटुंब उद्धवस्त झाल्यानंतर ढसाढसा रडला मसूद अझहर, म्हणाला….

Published:

दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी, भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. ऑपरेशन सिंधूर (Operation Sindoor) अंतर्गत केलेल्या या कारवाईत मोस्ट वॉन्टेड दहशतवादी मसूद अझहरच्या कुटुंबातील १४ सदस्यांनाही ठार मारण्यात आले आहे. या मोठ्या धक्क्यानंतर अझहरचे आश्रू थांबण्याचे नाव घेत नसून, ठार मारण्यात आलेल्यांच्या यादीत मसूद अझहरचा भाऊ आणि भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी रौफ असगरचा मुलगा हुजैफाचाही समावेश आहे. याशिवाय रौफ असगरच्या भावाच्या पत्नीलाही ठार करण्यात आले आहे. यानंतर आता मसूज अझहरची पहिली प्रतिक्रिया समोर आली असून, माझ्या कुटुंबाला जन्नत मिळाली असे म्हणत या कारवाईत मीही मेलो असतो तर बर झालं असतं अशा भावना व्यक्त केल्या आहेत.

Operation Sindoor कुटुंबाला जन्नत मिळाली पण मलाही मारलं असतं तर…

भारतीय सैन्यानं ऑपरेशन सिंधूर अंतर्गत केलेल्या कारवाईत मोस्ट वॉन्टेड दहशतवादी मसूद अझहरच्या कुटुंबातील १४ सदस्यांनाही ठार मारण्यात आल्यानंतर अझहरच्या पायाखालची जमीन सरकली असून, त्याच्या डोळ्यातील आश्रू थांबण्याचे नाव घेत नसून, हल्ल्या ठार झालेल्या माझ्या कुटुंबाला जन्नत मिळाली असे म्हणत या कारवाईत मीही मेलो असतो तर बर झालं असतं अशा भावना मसूद अझरनं व्यक्त केल्या आहेत.

Operation Sindoor मसूद अझहर कोण आहे?

मसूद अझहरचा जन्म १० जुलै १९६८ रोजी पाकिस्तानातील पंजाबमधील बहावलपूर येथे झाला. तो ११ भावंडांमध्ये तिसरा आहे. त्यांचे वडील अल्लाह बख्श शब्बीर हे शाळेचे मुख्याध्यापक आणि दारुल उलूम दिवानियाचे मौलवी होते. मसूदने कराचीतील जामिया उलूम-उल-इस्लामिया मदरशात शिक्षण घेतले, जिथे त्याने कट्टरपंथी विचारांचा स्वीकार केला. तो प्रथम हरकत-उल-मुजाहिदीन (HuM) मध्ये सामील झाला, ज्याने अफगाणिस्तानात सोव्हिएत सैन्याविरुद्ध जिहाद लढला. आता ही संघटना कट्टरपंथी देवबंदी विचारसरणीचे पालन करते आणि भारतापासून काश्मीर हिसकावून पाकिस्तानात विलीन करण्याचे स्वप्न पाहते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img