21.7 C
New York

Pawandeep Rajan: इंडियन आयडल विजेता पवनदीप राजनचा भीषण कार अपघात, गंभीर जखमी

Published:

इंडियन आयडल सीझन १२ (Indian idol 12) चा विजेता आणि प्रसिद्ध गायक पवनदीप राजन (pawandep Rajan) याचा ५ मे २०२५ रोजी पहाटे अहमदाबाद येथे भीषण कार अपघात झाला. हा अपघात पहाटे ३:४० च्या सुमारास गजरौला महामार्गावर घडला, ज्यामध्ये पवनदीप आणि त्याच्या दोन साथीदारांना गंभीर दुखापत झाली. पवनदीपच्या डाव्या पायाला आणि उजव्या हाताला गंभीर जखमा झाल्या असून, त्याला दिल्ली येथे पुढील उपचारासाठी रेफर करण्यात आले आहे.

सूत्रांनुसार, पवनदीप उत्तराखंडहून (uttarkhand) दिल्लीला (Delhi) जात असताना त्यांच्या कारची एका कँटरशी जोरदार धडक झाली. अपघाताचे नेमके कारण अद्याप समजलेले नाही, परंतु ड्रायव्हरला झोपेची झपकी आल्याने हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. रुग्णालयातील काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, त्यामध्ये पवनदीप बेशुद्ध अवस्थेत दिसत आहे. सध्या पवनदीपवर दिल्लीतील रुग्णालयात आयसीयू मध्ये उपचार सुरू आहेत पवनदीपच्या कुटुंबाकडून किंवा रुग्णालयाकडून अधिकृत अपडेट येणे बाकी आहे.

पवनदीपच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर त्याच्या प्रकृतीसाठी शुभेच्छा आणि प्रार्थना व्यक्त केल्या आहेत. पवनदीपने आपल्या सुमधुर आवाजाने आणि बहुआयामी प्रतिभेने देशभरात लाखो चाहत्यांची मने जिंकली आहेत. त्याच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहिती लवकरच समोर येईल, अशी अपेक्षा आहे. पवनदीप राजन यांच्या कार अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. गजरौला महामार्गावर पहाटे ३:४० च्या सुमारास कारची कँटरशी जोरदार धडक झाली. तपास सुरू असून, अधिक माहिती लवकरच समोर येईल.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img