ओतूर (Otur) ,प्रतिनिधी:दि.४ मे ( रमेश तांबे )
ओतूर ( ता.जुन्नर ) येथील वाघचौरेमळ्यात विकास मारूती वाकचौरे यांच्या घराजवळील गोठ्यामध्ये बिबट्याने घुसून ४शेळ्या व २ मेंढ्यांवर हल्ला करून ठार मारल्याची घटना शनिवारी दि.३ रोजी पहाटेच्या सुमारास घडली असल्याची माहिती ओतूरचे वन परिक्षेत्र अधिकारी लहू ठोकळ यांनी दिली.
घटनेची माहिती कळताच वनपरिक्षेत्र अधिकारी लहू ठोकळ यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक विश्वनाथ बेले,किसन केदार,गंगाराम जाधव,गणपत केदार, रोहित लांडे या ठिकाणी पोहोचून पाहणी करून मृत पशुधनाचा पंचनामा करण्यात आला.तसेच सदर ठिकाणी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी तात्काळ पिंजरा लावण्यात आला असल्याचे वन परिक्षेत्र अधिकारी लहू ठोकळ यांनी सांगितले.लोकांमध्ये बिबट वन्य प्राण्याबद्दल माहिती देऊन जनजागृती करण्यात आली आणि असा काही प्रकार घडल्यास त्वरित वन विभागाला कळविण्यात यावे असे आवाहन देखील वन विभागाच्या वतीने करण्यात आले.