11.6 C
New York

Latest News Updates : राज्यातील महत्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर…

Published:

जालन्यात सलग चार दिवसापासून अवकाळीचा कहर, पुढील चार दिवस जिल्ह्यात येलो अलर्ट जारी

जालना जिल्ह्यात अवकाळी पावसाचा कहर पाहायला मिळतोय. जालन्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतातील झाडे उखडून पडली आहे. जिल्ह्यात विज पडून दोघांचा दुर्दैव मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले आहे. जालन्यातील सराटे वझर शिवारात वादळी वाऱ्यामुळे झाडे उकडून पडली आहे तर भोकरदन तालुक्यातील भायडी शिवारात वीज पडून रामदास फड यांचा दुर्दैव मृत्यू झाला आहे तर केदारखेडा येथील राहुल जाधव या तरुणाचा देखील वीज पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मागील चार दिवसापासून जालना जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचा कहर पाहायला मिळतोय तर पुढील चार दिवस हवामान विभागाकडून जालना जिल्ह्याला येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे..

लोहारा, उमरगा शहरासह तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा

धाराशिव च्या लोहारा,उमरगा शहरासह तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपले आहे.अनेक ठिकाणी झाडे तुटुन पडली तर विजेच्या तारा देखील तुटल्या आहेत.कास्ती खुर्द या गावात शेतात झाड पडुन शेतकऱ्याची म्हैस दगावली तर लोहारा शहरातील झिंगाटे प्लॉट मध्ये घरासमोर झाड पडुन कारचे नुकसान झाले. जवळपास तासभर झालेल्या पावसाने कांद्यासह फळपिकांचे व भाजीपाल्याचे देखील नुकसान झाल आहे तर अनेक भागता विजपुरठा खंडीत झाला आहे.

रायगडला लवकरच पालकमंत्री मिळेल – अजित पवार

रायगड जिल्ह्याला लवकरच पालकमंत्री मिळेल हा मुख्यमंत्र्यांचा निर्णय आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलंय. मात्र पालकमंत्री नसतानाही जिल्ह्यातील निधी खर्च व्हावा तो लॅप्स होऊ नये यासाठी प्रयत्न केले. तसेच जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून लोकसंख्येच्या निकषावर रायगड जिल्ह्याला जास्तीत जास्त निधी दिल्याचे अजित पवार यांनी सांगितलं.

संतोष देशमुख हत्या प्रकरणाची बीडच्या न्यायालयात आज सुनावणी

संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पाचवी सुनावणी आज बीडच्या विशेष न्यायालयासमोर होत आहे. या सुनावणीसाठी सरकारी वकील उज्वल निकम सुनावणीसाठी उपस्थित राहणार नसल्याची माहिती समोर आली आहे या अगोदरच्या सुनावणीच्या वेळेस देखील सरकारी वकील उज्वल निकम गैरहजर होते त्यांच्या जागी विशेष सहाय्यक सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी काम पाहिले होते आज बीडच्या विशेष न्यायालयासमोर संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पाचवी सुनावणी होत आहे.

मराठवाड्यात अवकाळी पावसाने दणादाण, वीज कोसळून ३ जण ठार

मराठवाड्यात अवकाळी पावसाने दणादण उडवली. वीज कोसळून ३ जण ठार; अकरा जनावरे दगावली तर उन्हाळी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. शहरी भागात अनेक घरात पाणी शिरले. अवकाळीने संभाजीनगर जिल्ह्याला जोरदार झोडपले. संभाजीनगरात विक्रमी ५९.४ मिलिमीटर पाऊस झाला. आज सकाळपासून ढगाळ वातावरण असल्यानं आजही अवकाळी पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील सगळ्या जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस पडतोय. मात्र काल सायंकाळी या उन्हाळ्यातील सगळ्यात मोठा अवकाळी पाऊस वादळी वाऱ्यासह झाला.

पुणे – मिरज – कोल्हापूर मार्गावर नवी डेमू सुरू

अखेर पुणे – मिरज – कोल्हापूर मार्गावर नवी डेमू ( डिझेल इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट ) रेल्वे गाडी धावू लागली आहे. दैनिक सकाळच्या बातमीमुळे वारंवार बंद पडणाऱ्या लाल डेमू पासून प्रवाशांची सुटका झाली आहे. मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून वारंवार बंद पडणारी लाल डेमू हटवून त्याजागी नवी कोरी डेमू या मार्गावर दाखल झाली आहे. यात सुटसुटीत आसन व्यवस्थित सह अन्य सुविधा देण्यात आल्या आहेत.

बुलढाण्यात विजांच्या कडकडाटात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस

बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी पावसाचा जोर अद्याप कायम आहे .. मागील आठवड्यापासून जिल्ह्यात भाग बदलत.अवकाळी पाऊस पडत आहे .. सोबतच विजांच्या कडकडाटासह वादळी वारा आल्याने शेतकऱ्यांच्या उन्हाळी पिकांचे नुकसान सुद्धा होत आहे .. काल सायंकाळी सुद्धा विजांच्या कडकडाटात तसेच वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला.. साखरखेर्डां परिसरात ही मुसळधार पाऊस झाल्याने शेतातील नाल्या वाहू लागल्या तर वीज पडल्याने शेतकऱ्यांचे चार जनावरे सुद्धा मरण पावली .. अनेक भागात उन्हाळी पिक अद्याप उभी असल्याने त्यांचे सुद्धा नुकसान झाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img