19.9 C
New York

RBI : 100 आणि 200 रुपयांच्या नोटांबाबत RBI चा नवीन निर्णय

Published:

चेक नसल्यास पैसे काढण्याची वारंवार अडचण होऊ नये आणि तात्काळ पैशांची सोय व्हावी म्हणून बॅंकांनी (RBI) एटीएमची सोय केली. मात्र, अनेकदा या ATM मध्ये 500 रुपयांच्या नोटाच उपलब्ध असतात. त्यामुळे ग्राहकांची अडचण होते. यावर आरबीआयने तोडगा काढला आहे. भारतीय रिझर्व्ह बॅंकेने सोमवारी सर्व बॅंका आणि व्हाइट लेबल एटीएम ऑपरेटर्सना एटीएम सेंटरमध्ये 100 तसेच 200 रुपयांच्या जास्त नोटा ठेवण्याचे आदेश दिले आहेत. म्हणजेच, आता एटीएम सेंटरमध्ये केवळ 500 नाही तर 100 आणि 200 रुपयांच्या नोटा देखील मिळणार असल्याने ग्राहकांची अडचण होणार नाही. (atm cash withdrawal now get 100 and 200 rupee notes easily from atms rbi issues big order to banks)

या संदर्भात आरबीआयने एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. नागरिकांना 100 आणि 200 रुपयांच्या पुरेशा नोटा एटीएम केंद्रात ठेवण्याबाबत सांगितले आहे. यासाठी बॅंका आणि व्हाइट लेबल एटीएम (WLA) ऑपरेटर्सना आवश्यक ती काळजी घेण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. या निवेदनानुसार, 30 सप्टेंबर 2025 पर्यंत देशातील 75 टक्के एटीएममधील एका कॅसेटमध्ये (पैसे ठेवण्यासाठी वापरला जाणारा बॉक्स) 100 तसेच 200 च्या नोटांची व्यवस्था केली जाईल. तर, 31 मार्च 2026 पर्यंत 90 टक्के एटीएममध्ये ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

ज्या नोटा प्रामुख्याने वापरल्या जातात, त्या नोटा ग्राहकांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे आरबीआयने म्हटले आहे. त्यामुळेच एटीएम केंद्रातून नियमितपणे 100 आणि 200 रुपयांच्या नोटा मिळतील, याची काळजी संबंधितांना घेण्यास सांगण्यात आले आहे.

RBI व्हाइट लेबल एटीएम काय आहे?

व्हाइट लेबल एटीएम म्हणजे अशी एटीएम सेंटर्स जी बॅंका किंवा खासगी तसेच गैर बॅंकिंग कंपन्या सुरू करतात. त्यातूनही तुम्ही डेबिट किंवा क्रेडिट कार्डाच्या मदतीने पैसे काढू शकता किंवा बॅलन्स चेक करू शकता. तसेच एखाद्या बॅंकेच्या एटीएम केंद्रात ज्या सुविधा मिळतात, त्या सगळ्या यात उपलब्ध होतील.

RBI 1 मे पासून एटीएममधून पैसे काढणे महागणार

1 मे पासून एटीएम मधून पैसे काढणे महागणार आहे. कोणत्याही एटीएम सेंटरमधून काही व्यवहार मोफत असतात. त्यानंतर प्रत्येक व्यवहाराला 23 रुपयांचे शुल्क आकारले जाईल. आतापर्यंत हे शुल्क 21 रुपये एवढे होते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img