22 C
New York

Nag Ashwin : नाग अश्विन यांचा हैदराबाद ते हॉलिवूड पर्यंतच प्रवास?

Published:

सिनेविश्वात काही दिग्दर्शक आपल्या कामातील बारकाव्यांसाठी आणि परिपूर्णतेसाठी प्रसिद्ध आहेत. अशाच दिग्दर्शकांमध्ये नाग अश्विन (Nag Ashwin) यांचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते. खरं तर त्यांचे पूर्ण नाव सिंगिरेड्डी नाग अश्विन रेड्डी असले तरी लोक त्यांना ‘नाग अश्विन’ या नावानेच ओळखतात. त्यांनी जास्त चित्रपट दिग्दर्शित केले नसले तरी त्यांच्या प्रत्येक चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात एक खास स्थान मिळवलं आहे. २३ एप्रिल १९८६ रोजी हैदराबादमध्ये जन्मलेल्या नाग अश्विन यांचे संपूर्ण कुटुंब डॉक्टरी पेशात आहे. वडील जयराम, आई जयंती रेड्डी आणि बहिणीदेखील डॉक्टर. पण नाग अश्विनने वेगळा मार्ग निवडला. त्यांनी मास कम्युनिकेशनचं शिक्षण घेतलं आणि न्यूयॉर्क फिल्म अकादमीमधून दिग्दर्शनाचा कोर्स पूर्ण केला. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी अजय शास्त्री यांच्या सोबत ‘नेनू मीकू तेलुसा’ या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं.

२०१५ साली नाग अश्विनने ‘येवडे सुब्रमण्यम’ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केलं, ज्यात विजय देवरकोंडा झळकला होता. हा चित्रपट प्रेक्षकांनी भरभरून स्वीकारला. त्यानंतर त्यांनी ‘महानती’ या चित्रपटाद्वारे दक्षिण भारतीय अभिनेत्री सावित्री यांच्या जीवनावर आधारित एक अप्रतिम चरित्रपट तयार केला, ज्यामुळे त्यांची विशेष प्रशंसा झाली. नाग अश्विनचा सर्वात मोठा प्रोजेक्ट म्हणजे ‘कल्की २८९८ ए.डी.’ हा सायन्स-फिक्शन चित्रपट, ज्यात प्रभास, दीपिका पदुकोण, अमिताभ बच्चन आणि कमल हासन यांसारख्या दिग्गज कलाकारांचा समावेश आहे. ६०० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेला हा चित्रपट जगभरात १००० कोटींची कमाई करत सुपरहिट ठरला आणि नाग अश्विन यांना आंतरराष्ट्रीय ओळख मिळवून दिली.

व्यक्तिगत आयुष्यात नाग अश्विनने चित्रपट निर्माती प्रियांका दत्तसोबत विवाह केला आहे. तिने वयाच्या २० व्या वर्षीच चित्रपट निर्मितीत पाऊल ठेवले. ती ‘द एंजल्स स्टुडिओ’ची संस्थापक आहे. २०१३ मध्ये तिची शॉर्ट फिल्म ‘यादों की बारात’ कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्येही दाखवली गेली होती. आज नाग अश्विन आणि प्रियांका दत्त हे जोडपं इंडस्ट्रीमध्ये एक यशस्वी आणि प्रेरणादायी जोडी म्हणून ओळखलं जातं. त्यांच्या यशस्वी प्रवासानंतर आता सर्वांना नाग अश्विनचा पुढचा सुपरहिट चित्रपट कधी येणार याची उत्सुकता आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img