17.9 C
New York

Devmanus : देवमाणूस – मधला अध्याय’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Published:

झी मराठीवरील प्रचंड गाजलेली मालिका ‘देवमाणूस’ (Devmanu) पुन्हा एकदा नव्या रूपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. किरण गायकवाडच्या मुख्य भूमिकेतील या मालिकेने पहिल्या दोन सिझनमध्ये प्रेक्षकांची मनं जिंकली होती. आता ‘देवमाणूस – मधला अध्याय’ या नव्या सिझनचा प्रोमो नुकताच सोशल मीडियावर झळकला असून, चाहत्यांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळतोय.

या प्रोमोची सुरुवात सरू आज्जीच्या धमाल शिव्यांनी होते आणि त्यानंतर ती देवमाणसाची खरी कहाणी उलगडते. डॉक्टरच्या वेशात गावात आलेला देवमाणूस कसा बायकांना फसवत होता, तो मेला असं जरी सांगितलं गेलं तरी पुन्हा गावात परत येऊन आपल्या कारवाया सुरू करतो, हे ती सांगते. या दरम्यान सरू आज्जीचा प्रश्न – “ह्यो गायब असताना कुठं वणवा पेटवत होता?” – विशेष गाजतोय. यावेळी किरण गायकवाड एका नवीन अवतारात, म्हणजेच टेलरच्या भूमिकेत दिसणार आहे. प्रोमोमध्ये त्याचा “या माप घेतो..” हा डायलॉग सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालाय. या तिसऱ्या सिझनमध्ये पुन्हा एकदा रुक्मिणी सुतार म्हणजेच सरू आज्जी आणि काही नवीन गावाकडची इरसाल पात्रं प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.

‘देवमाणूस – मधला अध्याय’ची कथा पहिल्या आणि दुसऱ्या सिझनच्या मधल्या काळावर आधारलेली आहे. डॉक्टर अजितकुमार देव गाव सोडून गेल्यानंतर तो कुठे होता, काय करतो होता, आणि त्यानं तिथेही कसा फसवाफसवी केली याचा थरार या मालिकेत उलगडणार आहे. मालिकेचं लेखन स्वप्नील गांगुर्डे आणि विशाल कदम यांच्या जबाबदारीवर असून, दिग्दर्शन राजू सावंत करत आहेत. याआधीच्या सिझनप्रमाणे याही वेळी खुसखुशीत गावरान संवाद आणि उत्कंठावर्धक कथा प्रेक्षकांच्या भेटीला येणार, याची खात्री आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img