11 C
New York

Sanjay Raut : मविआत मैत्रीपूर्ण लढती? राऊतांचं वक्तव्य महायुतीचं टेन्शन वाढवणार..

Published:

विधानसभा निवडणुकीत उमेदवारांनी अर्ज दाखल (Maharashtra Elections 2024) झाले आहेत. आता माघार घेण्यासाठी दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत. अनेक मतदारसंघात बंडखोरी झाली आहे. नाराजी उफाळून आली आहे. उमेदवारी मिळाली नाही म्हणून दुसऱ्या पक्षातून काही जणांनी तिकीट मिळवलं आहे. तर काही जणांनी थेट अपक्ष म्हणून निवडणुकीत उडी घेतली आहे. या बंडखोरांची मनधरणी करण्याची मोहिम सध्या सुरू आहे. तर दुसरीकडे अनेक मतदारसंघांत मैत्रीपूर्ण लढती होतील अशी स्थिती आहे. सात ते आठ जागांवर मविआतील मित्र पक्षांकडून दोन उमेदवार देण्यात आले आहेत. त्यामुळे या मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत होणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी (Sanjay Raut) मोठं विधान केलं आहे.

निवडणुकीच्या काळात कोण काय आरोप करतं याकडे फार गांभीर्याने पहायचं नसतं. काही जागा या मित्र पक्षांतील विद्यमान आमदारांच्या होत्या. आमच्या विद्यमान आमदारांच्या जागा आम्ही सोडल्या नाहीत. तसे काँग्रेसही सोडू शकले नाही. कोणताच पक्ष आपण निवडून आलेल्या जागा सोडण्यास तयार नव्हता. ही गोष्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी देखील समजून घेतली पाहिजे. भिवंडीची जागा आम्हाला मिळावी यासाठी आम्ही प्रयत्न केले होते. परंतु, या मतदारसंघात समाजवादी पार्टीचा आमदार आहे. आम्ही भरपूर प्रयत्न केले पण समाजवादी पार्टीने जागा काही सोडली नाही.

जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यावर अजित पवार गटाचा जोरदार पलटवार

राज्यात सात ते आठ ठिकाणी मविआचे दोन-दोन उमेदवार आहेत. महायुतीतही चार ते पाच ठीकाणी मैत्रीपूर्ण लढती होणार आहेत. त्यामुळे मविआतही अशाच मैत्रीपूर्ण लढती होतील का असा प्रश्न विचारला असता राऊत म्हणाले, आम्ही अशा प्रकारच्या लढतीत काही पडणार नाही. मुलुंड मतदारसंघात संगीता वाजे उमेदवार आहेत. त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार आहेत. तरी या मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराने अर्ज भरला आहे. त्यांना आम्ही अधिकृत मानत नाही. असे आणखी काही घडलेले असेल तर आमच्याकडे उद्या दुपारपर्यंतचा वेळ आहे. त्यातून काही मार्ग काढू. सगळे अर्ज माघारी घेतले जातील. एकास एक लढत होईल याची काळजी आम्ही घेऊ, असे खासदार संजय राऊत म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img