11 C
New York

Eknath Shinde : भाजप पदाधिका,भाजप पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेचा इशारा

Published:

विधानसभेसाठी ४ नोव्हेंबर रोजी जागा अर्ज मागे घेता येणार आहे. त्यानंतर प्रचाराची रणधुमाळी सुरु होणार आहे. परंतु, त्यापूर्वीच महायुतीमधील वाद समोर आला आहे. (Maharashtra ) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासंदर्भात भाजप पदाधिकाऱ्याने वक्तव्य केलं आहे. त्यानंतर शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसेनेने ‘माफी मागा, अन्यथा भाजपचं काम करणार नाही’, असा सरळ इशारा दिला आहे. उल्हासनगर भाजपा जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद पेटला आहे.

Eknath Shinde नेमका वाद कशामुळे

प्रदीप रामचंदीनी यांनी उल्हासनगरमधील भाषणात म्हटलं होतं की, ज्यांना गद्दार म्हटलं जातं ते मुख्यमंत्री बनतात. आता राजकारणाची व्याख्या बदलली आहे. ज्यांनी विश्वासघात केला ते आमच्या पक्षात आले आहेत, असे आम्ही अभिमानानेच म्हणू असंही ते म्हणाले आहेत. दरम्यान, उल्हासनगरचे भाजपा जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याने शिवसेना आक्रमक झाली आहे.

शरद पवारांच्या राष्ट्रवादीला पुण्यात बूस्ट; पठारेंनी पक्षात आणली तरुणांची फळी

Eknath Shinde वक्तव्यानंतर शिवसेना आक्रमक

या वक्तव्यानंतर उल्हासनगरमधील शिवसैनिक आक्रमक झाली आहेत. जोपर्यंत जिल्हाध्यक्ष रामचंदानी हे माफी मागणार नाहीत, तोपर्यंत शिवसेनेचा एकही कार्यकर्ता भाजप आमदार आणि उमेदवार कुमार आयलानी यांचं काम करणार नाही, अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे. शिवसेनेच्या या भूमिकेमुळे आमदार कुमार आयलानी अडचणीत येण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img