11 C
New York

Mumbai : मुंबईत पावसामुळे वायू प्रदूषण घटले

Published:

गेल्या काही काळापासून मुंबईसाठी (Mumbai) प्रदूषण हा चिंतेचा विषय ठरला आहे. राज्य तसेच केंद्र सरकारकडून अनेक प्रयत्न करून प्रदूषण नियंत्रित ठेवण्यासाठी अनेक पाऊले उचलली गेली आहेत. अशामध्ये काही प्रमाणात वायू प्रदूषण कमी करण्यास यश आले असले, तरीही पर्यावरण अभ्यासकांनी चिंता व्यक्त केली आहे. एका अभ्यासातून समोर आले की, मुंबईच्या नोंदविण्यात येणारे वायूप्रदूषणातील घटक आता पावसाच्या पाण्याबरोबर जमिनीत मुरत आहेत. यामुळे जैवविविधतेला धोका निर्माण होऊ शकतो, असा इशारा पर्यावरण अभ्यासकांकडून देण्यात आला आहे. (Mumbai air pollution reduced but survey expressed concern)

आवाज फाउंडेशनने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईमध्ये नोंदवले जाणारे वायू प्रदूषणाचे घटक हे पावसाच्या पाण्यासोबत जमिनीमध्ये मुरत आहेत तसेच जमिनीवरून समुद्रात वाहत जात आहेत. त्यामुळे वायू प्रदूषणानंतर आता आणखी एका प्रदूषणाला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे, असे म्हणत त्यांनी चिंता व्यक्त केली.पावसामुळे शहरातील हवेच्या गुणवत्तेचा दर्जा सुधारला आहे. पण, असे असले तरीही ऑक्टोबर हिटमुळे मुंबईकर हैराण झाले आहेत. मुंबईतील नागरिकांना दिवसभर उन्हाचे चटके खावे लागत असून रात्री मात्र पावसाचा सामना करावा लागत आहे. अशामध्ये याचा परिणाम हा मुंबईतील नागरिकांच्या आरोग्यावर पडतानाही दिसत आहे. तर, दुसरीकडे या नव्या प्रदूषणाचा फटकाही मुंबईकरांना बसू शकतो.

आवाज फाउंडेशनचे संस्थापक सुमेरा अब्दुलअली म्हणाले की, “वातावरणामध्ये धूळीकण, कॉक्रिटचे कण, धूर यांचा समावेश असतो. जेव्हा पाऊस पडतो तेव्हा हे घटक पावसाच्या पाण्यासोबतच जमिनीवर येतात. त्यामधील काही घटक हे जमिनीमध्ये मुरतात तर काही नदी, नाल्यांमधून समुद्रात वाहून जातात. त्यामुळे जमिनीसह समुद्रातील प्रदूषणात भर पडते. या नव्या प्रदूषणामुळे जैवविविधतेला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.” असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे. त्यामुळे एकीकडे हवेतील गुणवत्ता जरी सुधारली असली तरीही या नव्या प्रदूषणाचा फटका बसणार का? अशी चर्चा सध्या सुरू आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img