10.6 C
New York

Eknath Shinde : आझाद मैदानावर शिंदेंची तोफ धडाडणार, विधानसभेचे वातावरण तापणार?

Published:

राज्यात येत्या काही दिवसात विधानसभेसाठी आचारसंहिता लागू होणार आहे. त्यामुळे प्रत्येक पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी धावपड करताना दिसत आहे. तर दुसरीकडे आझाद मैदानावर (Azad Maidan) 12 ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा (Shivsena Dasara Melava 2024) होणार आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी होत असलेल्या या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. आझाद मैदानावर सायंकाळी 5.30 वाजता या मेळाव्याला सुरुवात होणार आहे. शिवसेनेकडून सोशल मीडियावर या मेळाव्याचा टिझर प्रदर्शित करण्यात आला आहे. या टिझरमध्ये व्यंगचित्रातून उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) जोरदार टीका देखील करण्यात आली आहे. सध्या आझाद मैदानावर या मेळाव्यासाठी जोरदार तयारी सुरु आहे. सध्या मोठे स्टेज आझाद मैदानावर उभारण्याचे काम सुरु आहे तर माहितीनुसार, या मेळाव्यात तब्बल 50 हजार लोकांची बसण्याची व्यवस्था शिवसेनेकडून करण्यात येत आहे.

आता वचपा काढण्याची वेळ, राज ठाकरेंनी शुभेच्छा देताना केलं ‘हे’ आवाहन

तर दुसरीकडे मिळालेल्या माहितीनुसार, जर या मेळाव्यात पावसाची सुरुवात झाली तर फक्त दोन नेत्यांना कार्यकर्त्यांना संबोधित करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह आणखी कोणाला संधी मिळणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे आणि जर पाऊस झाला नाहीतर चारच नेते आपल्या भाषणांमधून शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार असल्याची देखील माहिती सध्या समोर आली आहे. त्यामुळे उद्या होणाऱ्या दसरा मेळाव्यात आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या शिवसैनिकांना काय मार्गदर्शन करणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img