19.9 C
New York

Eknath Shinde  : शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचे ठिकाण बदलले,काय आहे कारण ?

Published:

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याची परंपरा सुरु केली होती. (Eknath Shinde)  त्यानंतर दरवर्षी दसरा मेळावा होत असतो. शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना उबाठाकडून वेगवेगळे दसरा मेळाव्या घेतले जातात. उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा होतो. दसरा मेळावा बीकेसीमधील तर एकनाथ शिंदे यांचा एमएमआरडीए मैदानावर होतो. यंदा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने दसऱ्या मेळाव्याचे स्थान बदलले आहे. मुंबईतील आझाद मैदानावर आता हा मेळावा होणार आहे.

शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा मुंबईच्या आझाद मैदानात होणार आहे. सध्या भव्य असे व्यासपीठ त्यासाठी आझाद मैदानात उभारण्याचे काम सुरू आहे. जोरात गवत कापून मैदान साफ करण्याचे काम सुरू आहे. यंदा भव्य शक्ती प्रदर्शन विधानसभा निवडणूक असल्यामुळे शिवसेनेकडून दसरा मेळाव्याच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. 50 हजार लोक बसतील इतक्या खुर्च्या सध्या आझाद मैदानामध्ये आणण्यात आलेल्या आहेत.

उद्धव ठाकरेंकडून अमित शाहांची पोलखोल

Eknath Shinde  का बदलले मैदान

बीकेसीमधील एमएमआरडीए ग्राउंडमध्ये शिवसेनेचा दसरा मेळावा होणार होता. पण वाहतूक व्यवस्था ट्रॅफिकची समस्या उद्भवत असल्याने लक्षात घेता अचानक हा निर्णय बदलण्यात आला आहे. मेळाव्याच्या तयारीला त्यामुळे आझाद मैदानात सुरुवात झाली आहे.

Eknath Shinde  शिवसेनेचा तिसरा मेळावा

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा हा तिसरा दसरा मेळावा आहे. बीकेसी एमएमआरडी ग्राउंडवर पहिला दसरा मेळावा हा झाला होता. आझाद मैदानावर दुसरा मिळावा हा झाला होता. आता यंदाच्या तिसरा मेळावा हा सुद्धा आझाद मैदानावर होत आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वीचा हा मेळावा आहे. त्यामुळे त्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. शिवसेना मोठमोठे खुलासे , दावे, आश्वासन त्यासोबतच इतर पक्षातील नेत्यांचे पक्ष प्रवेश करून विधानसभेचे रणशिंग फुंकणार असल्याची माहिती मिळत आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून दसरा मेळाव्याचा टिझर जारी करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडून मेळाव्याची जोरदार तयारी केली जात आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img