19.1 C
New York

Eknath Shinde : एकनाथ शिंदे भाजपसाठी हा मतदारसंघ सोडणार का?

Published:

आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. (Eknath Shinde) गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. यंदाची विधानसभा निवडणूक महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी होणार आहे. सध्या या अनुषंगाने विविध बैठका होत आहेत. त्यातच आता केंद्रीय मंत्री नारायण राणे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर त्या दोघांची बैठक सुरु आहे. गेल्या तासाभरापासून नारायण राणे आणि एकनाथ शिंदे यांच्यात बैठक सुरु असल्याची माहिती समोर येत आहे.

Eknath Shinde अमित शाहांचा मुंबई दौरा

महाराष्ट्रातल्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून जोरदार तयारी सुरु आहे. भाजपला लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात अपेक्षित यश मिळालं नव्हतं. त्यामुळे आता येणारी विधानसभा निवडणूक ही भाजपसाठी जास्त प्रतिष्ठेची बनली आहे. येत्या निवडणुकीत काहीही करुन आपलं महायुतीचं सरकार यावं, यासाठी भाजपकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे सातत्याने महाराष्ट्र दौरे करत आहेत. त्यातच कालपासून दोन दिवस अमित शाह हे मुंबईत आहेत. यावेळी त्यांनी मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला. या मेळाव्याला नारायण राणेंनीही हजेरी लावली होती.

Eknath Shinde कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाबद्दल चर्चा

यानंतर आता नारायण राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. या भेटीत नारायण राणे यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीबद्दल चर्चा केली. तसेच महायुतीचा फॉर्म्युला कसा असणार, याबद्दलही त्यांच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी नारायण राणेंनी कुडाळ मालवण विधानसभा मतदारांबद्दलही चर्चा केली. कुडाळ मालवण विधानसभा मतदार भाजपला द्यावा, अशी मागणी नारायण राणेंनी एकनाथ शिंदेंकडे केली. सध्या या मतदारसंघात ठाकरे गटाचे वैभव नाईक हे विद्यमान आमदार आहेत.

Eknath Shinde एकनाथ शिंदे भाजपसाठी हा मतदारसंघ सोडणार का?

गेल्या काही महिन्यांपासून वैभव नाईक आणि राणे कुटुंबियांमध्ये सतत आरोप-प्रत्यारोप होत आहेत. त्यातच आता नारायण राणे यांनी कुडाळ मालवण विधानसभा मतदार भाजपसाठी सोडावा अशी मागणी केली आहे. त्यामुळे आता राणे कुटुंबियांकडून वैभव नाईक यांना तगडी टक्कर मिळणार असल्याचे दिसत आहे. पण एकनाथ शिंदे हा मतदारसंघ सोडणार का? या मतदारसंघाऐवजी ते कोणता मतदारसंघ मागणार, याबद्दल चर्चांना उधाण आले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img