19.1 C
New York

Sanjay Raut :  मुंबई अदानीच्या घशात घालण्याचे सरकारचे काम, राऊतांचा आरोप

Published:

शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदा नागपूर दौऱ्यावर आहेत. (Sanjay Raut) तसेच आज त्यांच्या हस्ते कळमेश्वर येथील छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. कळमेश्वरच्या जनतेची इच्छा आहे, जोपर्यंत या पुतळ्याचे अनावरण उद्धव ठाकरे करणार नाही, तोपर्यंत या पुतळ्याचे अनावरण होणार नाही, असे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. तसेच यावेळी त्यांनी सरकारवर देखील टीका केल्याचे पाहायला मिळाले आहे. संपुर्ण मुंबई अदानीच्या घशात घालण्याचे काम हे राज्य सरकार करत असल्याचे ते म्हणाले आहेत.

चांदापासून महाराष्ट्र अदानीच्या घशात घालण्याची सुरुवात झाली आहे. ही सुरुवात चांदापासून सुरू होऊन ती हळुहळु बांदापर्यंत जाणार आहे. तसेच विदर्भातही अनेक ठिकाणी जमिनींवर अदानीचे बोर्ड लागले आहेत. अनेक ऐतिहासिक वास्तू या ठिकाणी अदानीकडे जातील आणि या राज्याचे मुख्यमंत्री फक्त बघत राहतील अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे ते म्हणाले आहेत. तसेच चंद्रपुरची सार्वजनिक मालमत्ता अदानीला देण्यामागे भाजपाची भूमिका काय आहे. चंद्रपूरमध्ये भाजपाचे मंत्री सुधीर मुनंगटीवार यांनी याविषयी आपली भूमिका स्पष्ट करावी, असेही ते म्हणाले आहेत. तसेच जोपर्यंत महाराष्ट्रात आमची खरी शिवसेना आहे तोपर्यंत अदानीचे स्वप्न कदापी पुर्ण होणार नसल्याचे ते म्हणाले आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे अदानीसाठी काम करतात, अशी टीका देखील यावेळी त्यांनी केली आहे.

लाडकी बहीण योजनेचा भार… ‘या’ कर्मचाऱ्यांवर, राऊतांचा आरोप

रविवारी संध्याकाळी उद्धव ठाकरे कळमेश्वर येथे पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी जाणार आहेत. कळमेश्वरच्या जनतेची इच्छा आहे, जोपर्य़ंत या पुतळ्याचे अनावरण उद्धव ठाकरे करणार नाही तोपर्यंत या पुतळ्याचे अनावरण होणार नाही. त्यामुळे तो पुतळा झाकून ठेवला आहे. मात्र छत्रपतींचा पुतळा असा झाकून ठेवणे योग्य नव्हतं. तसेच मधील काही काळात चर्चा होती की, या पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री करतील मात्र जनतेने त्यासाठी नकार दिला आहे. त्यामुळे आज ठाकरेंच्या हस्ते छत्रपतींच्या पुतळ्याचे अनावरण होईल असे राऊत यांनी सांगितले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img