13.2 C
New York

Sanjay Raut : बदलापूर प्रकरणावरून राऊतांनी फडणवीसांवर साधला निशाणा

Published:

बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचे एन्काऊंटर झाले. या चकमकीचे श्रेय घेण्यासाठी सरकारमध्ये चढाओढ सुरु आहे. परंतु त्या ठिकाणी झालेले एन्काऊंटर कोणातरी वाचवायचे आहे म्हणून झाले आहे. पदाधिकारी चाईल्ड ट्रफिकिंगच्या प्रकरणाशी त्या शाळेतील संबंधित आहे. तो पदाधिकारी भाजप आणि संघाशी संबंधित आहे. त्याला वाचवण्यासाठी हे एन्काऊंटर झाले आहे. त्यामुळे पुरावा नष्ट करण्यात आला आहे. त्याचे उत्तर सरकारला आता उच्च न्यायालयात द्यावे लागणार आहे. या बलात्काराचे रहस्य कोर्टात समोर आले आहे, असे शिवसेना उबाठा नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटले आहे.

Sanjay Raut फडणवीस यांच्या मतदार संघात अत्याचाराच्या अनेक घटना

एका सरकारमध्ये दोने नेते एन्काऊंटरचे श्रेय घेण्यासाठी स्पर्धा करत आहेत. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात रस्सीखेच सुरु आहे. परंतु १०० पेक्षा जास्त महिलांवर देवेंद्र फडणवीस यांच्या विधानसभा मतदार संघातअत्याचार झाला आहे. मग त्यांनी किती लोकांचे एन्काऊंटर केले आहे. गुरुवारी नालासोपारामध्ये एका भाजप पदाधिकाऱ्याने महिलेवर अत्याचार केला आहे. आता त्याचे एन्काऊंटर करणार आहे का? असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुण्यामध्ये पूर्वनियोजित दौरा

Sanjay Raut बॅनर्सवरुन केला हल्ला

एन्काऊंटर प्रकरणानंतर ठिकठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बॅनर्स झळकले आहे. त्यावरुन संजय राऊत यांनी या दोन्ही नेत्यांना घेरले. ते म्हणाले, ही लोक स्वत:ला सिंघम समजत आहेत. तसे त्यांचे बॅनर लागले आहे. परंतु ती पडद्यावरील कथा जीवनात घडत नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या हातात बंदूक दाखवली आहे, काही लोक म्हणतात ते सिंघम. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या हातात रायफल दाखवली आहे, त्यांचेही लोक त्यांना सिंघम म्हणत आहेत. गेल्या काही वर्षांत या राज्यात असंख्य महिलांवर अत्याचार झाले आहेत. संजय राऊत यांनी किती अत्याचार करणाऱ्या लोकांचे एन्काऊंटर आपण केले अन् करणार आहात? असा प्रश्न विचारला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img