10 C
New York

PM Modi Visit In Pune : पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा, शहरातील विविध भागात वाहतूकीत बदल, जाणून घ्या..

Published:

पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आज पुण्यात पंतप्रधान मोदींचा (PM Modi Visit In Pune) दौरा आहे. पंतप्रधान मोदी यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक सुरक्षित आणि सुरळीतपणे होण्याच्या दृष्टिने तात्पुरत्या स्वरूपात विविध ठिकाणी ड्रॉप पॉइंट तसेच पार्किंगची ठिकाणं निश्चित करण्यात आली आहेत. या संबंधित आदेश पुणे शहर वाहतूक पोलीस उपायुक्त कार्यालयाच्या वतीनं जारी करण्यात आले आहेत. जाणून घ्या…

PM Modi Visit In Pune ड्रॉप पॉइंट, पार्किंगची ठिकाणे निश्चित

पुणे शहरातील दांडेकर पूल ते निलायम ब्रीज (सिंहगड मार्गावर), सावरकर पुतळा ते निलायम ब्रीज, न्यू इंग्लिश स्कूल टिळक मार्ग ते विसावा मारुती, सणस पुतळा चौक ते पूरम चौक, स. प. महाविद्यालय प्रवेशद्वार, नाथ पै चौक ते अलका चौक, अलका चौक ते भिडे जंक्शन व व्हीव्हीआयपी पार्किंग हे ड्रॉप पॉईंट निश्चित करण्यात आले आहेत. शहरातील भिडे पूल नदी पात्र (पावसाच्या परिस्थितीवर अवलंबून), निलायम टॉकीज, पाटील प्लाझा, विमलाबाई गरवारे शाळा, न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड, आबासाहेब गरवारे महाविद्यालय, डी. पी. रोड म्हात्रे पुलाजवळ, कटारिया हायस्कूल, न्यू इंग्लिश स्कूल रमनबाग, मिनर्व्हा पार्किंग मंडई, हरजीवन हॉस्पीटल सावरकर चौक, हमालवाडा पार्किंग व पीएमपीएल मैदान पूरम चौक या ठिकाणच्या जागा पार्किंगसाठी निश्चित करण्यात आल्या आहेत. समारंभाला येणाऱ्या बसेससाठी डी. पी. रोड कोथरूड तसेच शिवनेरी मार्ग, मार्केट यार्ड येथे पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे.

पुणे, पिंपरी चिंचवडमधील शाळांना सुट्टी; आज ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट

खंडोजीबाबा चौक-टिळक चौक- सेनादत्त पोलीस चौकी- उजवीकडे वळण घेवून म्हात्रे पूल डावीकडे डी.पी. रोड, सावरकर चौकामधून येणाऱ्या बसेससाठी दांडेकर पुलावरून सरळ राजाराम पूल- उजवीकडे वळण घेवून डी. पी. रोड, सिंहगड मार्गावरून येणाऱ्या बसेस दांडेकर पूल-सावरकर पुतळा-मित्रमंडळ चौक- व्होल्गा चौक-सातारा रोड मार्केट यार्ड जक्शन वरून शिवनेरी रोड असे बसेस पार्किंग मार्ग निश्चित करण्यात आले आहेत.

PM Modi Visit In Pune पुणे शहर वाहतूक पोलिसांकडून नागरिकांना आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमासाठी येणाऱ्या नागरिकांनी ड्रॉप पॉईंटच्या ठिकाणी उतरावे, त्यांची वाहने निश्चित केलेल्या पार्किंगच्या ठिकाणीच पार्क करावीत, असे आवाहनही पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पुण्यातील वाहतुकीत बदल करण्यात आलेले आहेत.पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त आज दुपारी 3 पासून वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img