19.1 C
New York

 Raj Thackeray  : मनसेची बैठक सोडून राज ठाकरे ‘वर्षा’वर

Published:

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. निवडणुका केंद्रीय निवडणूक आयोगाने अद्याप जाहीर केलेल्या नाहीत. सर्वच पक्षांकडून मात्र सध्या राजकीय डावपेच आखले जात आहे. एकीकडे जागावाटप, मुख्यमंत्रिपद आणि उमेदवारांची चाचपणी सुरु आहे. तरृ दुसरीकडे मोठमोठ्या नेत्यांच्या भेटीगाठी, बैठका आणि चर्चासत्र सुरु आहेत. राज्याच्या राजकारणात त्यातच आता मोठी घडामोड घडताना दिसत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे  (Raj Thackeray)  यांनी नुकतंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे. यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या.

सध्या अॅक्शन मोडवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आले आहेत. त्यातच आज सोमवारी सकाळीच राज ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्‍यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा निवासस्थानी ही भेट झाली. या भेटीत राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात जवळपास २० मिनिटे बंद दाराआड चर्चा झाली. राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने चर्चा झाल्याचे बोललं जात आहे. जागा वाटपावरून या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. तसेच राज ठाकरेंनी राज्यातील विकास कामांबाबतही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे. राजकीय वर्तुळात मात्र या भेटीमुळे आता खळबळ उडाली आहे.

 Raj Thackeray  राज ठाकरे आणि मुख्यमंत्री यांच्या बैठकीतील संभाव्य चर्चा

एकीकडे विधानसभा निहाय मनसेच्या निरीक्षकांची बैठक सुरू आहे. ज्यात किती जागांवर मनसे पारडं जड आहे, या संदर्भात चर्चा सुरू आहे. मनसे उत्तम प्रकारे त्यामुळे किती जागा लढू शकते? याची चाचपणी केली जात आहे. राज ठाकरे लोकसभा निवडणुकीत महायुतीसोबत गेले होते. त्यामुळे विधानसभेसाठी मनसे एकत्र आल्यास किती जागा महायुती सोडू शकते? याबाबत चर्चा होऊ शकते.

काँग्रेसच्या मुख्यमंत्रीपदाच्या भूमिकेवर हायकमांड निर्णय घेईल; संजय राऊतांची टीका

दादर माहीम हा शिवसेनेचा पारंपारिक गड आहे. जिथे आता सदा सरवणकर हे शिवसेनेचे आमदार आहेत. एकीकडे सदा सरवणकर यांना सिद्धिविनायक न्यास अध्यक्षपद दिले असताना ही जागा मनसेसाठी सोडावी याबद्दलही या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. तसेच अमित ठाकरे यांनी विधानसभा लढवावी अशी आग्रहाची मागणी कार्यकर्त्यांची आहे. त्यामुळे जर अमित ठाकरे निवडणूक लढवतील तर त्यांना पाठिंबा असेल का? याबद्दलही राज ठाकरेंनी शिंदेंसोबत चर्चा केल्याचे बोललं जात आहे. तसेच राज ठाकरे यांच्यावरील येक नंबर या सिनेमाचा ट्रेलर लॉन्चिंग बुधवारी करण्यात येणार आहे, यासाठीच आमंत्रण या बैठकीमध्ये दिलं जाणार आहे.

 Raj Thackeray  मनसे नेत्यांची ‘शिवतीर्था’वर बैठक

दरम्यान राज ठाकरे यांनी त्यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी मनसे नेत्यांची एक महत्त्वाची बैठक बोलवली आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघांबद्दल या बैठकीला आढावा घेतला जाणार आहे. या बैठकीला अनेक महत्त्वाचे मनसे नेते उपस्थित आहे. सध्या शिवतीर्थावर बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अविनाश अभ्यंकर, रिटा गुप्ता, संदीप देशपांडे हे नेते उपस्थित आहेत. या बैठकीत राज्यातील विधानसभा निहाय आढावा घेतला जाणार आहे. एकीकडे ही बैठक सुरु असताना दुसरीकडे राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतल्याने नक्की पडद्यामागे काय राजकारण घडतंय याबद्दल चर्चा सुरु झाल्या आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img